प्री-वेडिंग शूटसाठी गेलेल्या जोडप्यावर काळाचा घाला, पोझ देत असतानाच नदीत बुडून मृत्यू

प्री-वेडिंग शूटसाठी गेलेल्या जोडप्यावर काळाचा घाला, पोझ देत असतानाच नदीत बुडून मृत्यू

आठवड्याभरापूर्वी झाला होता साखरपूडा, महिन्यावर होतं लग्न; प्री-वेडिंग शूटचं बेतलं जीवावर.

  • Share this:

हैदराबाद, 10 नोव्हेंबर : लग्नाआधी जोडप्यांमध्ये प्री-वेडिंग (Pre-Wedding) शूट करणं आता एक ट्रेंड आहे. लग्नाआधी त्यांचे अविस्मरणीय फोटो काढण्यासाठी फोटोग्राफरही वेगवेगळ्या आयडिया काढत असतात. मात्र मैसूरमधील एका जोडप्यासाठी असाच एक प्री-वेडिंग शूट जीवघेणा ठरलं. शूटिंग दरम्यान या जोडप्याचा नदीत बुडून मृत्यू झाला.

सोमवारी कर्नाटकच्या तालकड येथील कावेरी नदीवर हे जोडपं प्री-वेडिंग शूट करत होतं. मृत शशिकला आणि चंद्रू यांचे एका आठवड्यांपूर्वी साखरपूडा झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, शशिकला आणि चंद्रू एक फोटोग्राफर आणि दोन नातेवाईकांसह मुदुकुदर येथील मल्लिकार्जुन स्वामी मंदिरात गेले होते. तेथे दोन बोटींनी नदी पार करून दुसऱ्या बाजूला जात असताना हा अपघात झाला.

वाचा-मृत समजून ज्या सुनेचं घातलं श्राद्ध, 'ती' प्रियकरासोबत पोलिसांसमोर राहिली उभी

पोझ देताना गेला तोल

शशिकला आणि चंद्रू एक मच्छीमार आणि नातेवाईकांसह बोटीतून जात होते. त्याचवेळी कपलच्या नातेवाईकांनी फोटो शूट करण्यास सुरवात केली. ही बोट साधारणपणे 10 ते 15 मीटर अंतरावर गेली होती. तेवढ्यात पोझ देण्यासाठी जोडपं उभं राहिलं आणि त्यांचं संतुलन बिघडून शशिकला पाण्यात पडली.

वाचा-बॉयफ्रेंडसोबत लग्नाला केला कुटुंबियांनी विरोध, थेट होर्डिंगवर जाऊन बसली तरुणी

बोट पलटी होऊन झाला मृत्यू

चंद्रूच्या शशिकलाला वाचविण्याच्या प्रयत्नात बोट पलटी झाली. चंद्रू, मच्छीमार आणि एक नातेवाईक नदीत पडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोट खराब झाल्यामुळे अचानक पलटी झाली. मच्छीमार नदीतून सुरक्षित ठिकाणी पोहला, मात्र शशिकला आणि चंद्रु यांना पोहता येत नसल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झाला.

Published by: Priyanka Gawde
First published: November 10, 2020, 4:25 PM IST
Tags:

ताज्या बातम्या