S M L

कर'नाटक' : भाजपच्या लाच टेपमधील आवाज माझ्या पत्नीचा नाही,काँग्रेस आमदाराचा खुलासा

शिवराम हेब्बर यांच्या फेसबुक पोस्टनंतर काँग्रेस बॅकफुटवर आलीये. आम्ही कधीच असा दावा नव्हता की आॅडिओमध्ये महिलेचा आवाज हा हेब्बर यांच्या पत्नीचा आहे असा खुलासाच काँग्रेसने केलाय.

Sachin Salve | Updated On: May 21, 2018 05:31 PM IST

कर'नाटक' : भाजपच्या लाच टेपमधील आवाज माझ्या पत्नीचा नाही,काँग्रेस आमदाराचा खुलासा

 

कर्नाटक,21 मे : कर्नाटकात राजकीय नाट्य सुरूच आहे. काँग्रेसने दोन दिवसांपूर्वी एक आॅडिओ प्रसिद्ध केला होता. यात भाजपने येल्लापूरचे आमदार शिवराम हेब्बर यांच्या पत्नीला फोन करून आमिष दिलं होतं. पण आता हेब्बर यांनीच असा कोणताही फोन आला नव्हता असा खुलासा केलाय.

हेब्बर यांनी फेसबुकवर एक पोस्ट प्रसिद्ध केलीये. यात त्यांनी म्हटलं की, भाजपकडून आमिष देणारा फोन काॅल हा बनावट होता. यात जो महिलेचा आवाज होता तो माझ्या पत्नीचा नव्हता. ही आॅडिओ क्लिप बनावट आहे, असं राजकारण निंदणीय आहे अशी टीका हेब्बर यांनी केली.शिवराम हेब्बर यांच्या फेसबुक पोस्टनंतर काँग्रेस बॅकफुटवर आलीये. आम्ही कधीच असा दावा नव्हता की आॅडिओमध्ये महिलेचा आवाज हा हेब्बर यांच्या पत्नीचा आहे असा खुलासाच काँग्रेसने केलाय.

तर हा आवाज ज्या महिलेचा आहे तीने स्टिंग आॅपरेशन केलं होतं. जेव्हा त्यांना पैशांची आॅफर देण्यात आली होती त्याचा आॅडिओ त्यांनी रेकाॅर्ड करून आम्हाला पाठवला. आम्ही जास्तीत जास्त भाजपचे नेते ट्रप करण्याच्या प्रयत्नात होतो असं काँग्रेसचे आमदार आणि प्रवक्ते वीएस उगरप्पा यांनी न्यूज18 ला सांगितलं.

आता ती महिला कोण आहे यापेक्षा आमिष देण्याची ओळख होणे गरजेचं आहे. त्याने पहिले 15 कोटींची आॅफर दिली नंतर 5 कोटी आणि कॅबिनेटपदाची आॅफर दिली होती अशी माहितीही उगरप्पांनी दिली.

Loading...
Loading...

जेव्हा 15 दिवसांची मुदत 24 तासांत आली तेव्हा भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली होती. भाजपचे नेते इतके उतावळे झाले होते की जो कोणी भेटेल त्याला आमिष देत होते असंही उगरप्पांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 21, 2018 05:31 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close