कर्नाटकातील काँग्रेस – जेडीएस सरकार अडचणीत; 8 आमदारांचा राजीनामा

कर्नाटकातील काँग्रेस – जेडीएस सरकार अडचणीत; 8 आमदारांचा राजीनामा

कर्नाटकातील काँग्रेस - जेडीएस सरकारचं भवितव्य आता अधांतरी आहे.

  • Share this:

बंगळूरू, 06 जुलै : कर्नाटकातील काँग्रेस – जेडीएस सरकार पडणार का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण, काँग्रेस – जेडीएस सरकारमधील 8 आमदारांनी आपले राजीनामे विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यामुळे काँग्रेस – जेडीएस सरकार अडचणीत आलं आहे. दरम्यान, आठ आमदारांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे महासचिव के. के. वेणुगोपाळ हे कर्नाटककडे रवाना झाले आहेत. राजीनामा देणाऱ्या आमदारांमध्ये 5 आमदार काँग्रेस तर 3 आमदार हे जेडीएसचे आहेत. यापूर्वी, 2 जुलै रोजी देखील काँग्रेसच्या रमेश जारकीहोळी आणि आनंद सिंग यांनी आपले राजीनामे दिले होते. त्यानंतर येत्या 3 दिवसात आणखी 12 आमदार राजीनामे देणार असल्याची माहिती देखील सुत्रांनी दिली होती. काँग्रेसमधील अनेक आमदार मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे आमदारांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वी एच. डी. देवेगौडा यांनी देखील सरकार किती टिकेल याबद्दल शंका वाटते अशा आशयाचं विधान केलं होतं. त्यावरून देखील अनेक तर्कवितर्क लढवले गेले होते. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएसनं हातमिळवणी केली होती. शिवाय, जास्त संख्याबळ असताना देखील काँग्रेसनं भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कुमारस्वामी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली होती. पण, आता मात्र काँग्रेस आमदारांच्या राजीनाम्यामुळे कर्नाटकातील सरकार जाणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

स्नान करताना महिलेचा व्हिडीओ तयार करणारा पोलीस गजाआड

अडीच दिवसांचं सरकार

दरम्यान, भाजपनं सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर अवघ्या अडीच दिवसांमध्ये येडीयुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भाजपनं केलेल्या सत्ता स्थापनेच्या दाव्यानंतर हे सारं प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील गेलं होतं. कर्नाटकमध्ये हातचं गेलेलं सरकार भाजपच्या देखील जिव्हारी लागलं होतं. तेव्हापासून भाजपनं सरकार अस्थिर करण्याचा देखील प्रयत्न केला होता. पण, आता मात्र काँग्रेस आमदारांच्या राजीनाम्यामुळे कर्नाटकातील काँग्रेस – जेडीएस सरकारचं राजकीय भवितव्य अधांतरी आहे. एच.डी. कुमारस्वामी यांनी 23 मे 2018ला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

VIDEO: भाजप खासदार-टोल कर्मचाऱ्यांमध्ये वाद, कार्यकर्त्यांकडून हवेत गोळीबार

First published: July 6, 2019, 1:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading