या एका नेत्यामुळे टळू शकेल कर्नाटकातील Congress – JDS सरकारवरील संकट

कर्नाटकातील काँग्रेस - जेडीएस सरकार अडचणीत असून भाजप राजकीय डाव साधणार का? याकडे सर्वाचं लक्ष आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 7, 2019 09:31 AM IST

या एका नेत्यामुळे टळू शकेल कर्नाटकातील Congress – JDS सरकारवरील संकट

बंगळूरू, 07 जुलै : कर्नाटकमध्ये काँग्रेस – जेडीएस सरकारचं भवितव्य अधांतरी आहे. कारण, शनिवारी 14 आमदारांनी आपले राजीनामे दिले. त्यामुळे काँग्रेस – जेडीएस सरकार टिकणार की जाणार? यावर आता चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, राजीनामा देणाऱ्या आमदारांमध्ये काँग्रेसचे 11 आणि जेडीएसच्या 3 आमदारांचा समावेश आहे. काँग्रेस – जेडीएस सरकारचं भवितव्य एका नेत्याच्या हातात आहे असून तो नेता म्हणजे रामलिंग रेड्डी. रामलिंग रेड्डी हे बंडखोर आमदारांचं नेतृत्व करत आहेत. रामलिंग रेड्डी यांची मनधरणी करण्यात काँग्रेसला यश आल्यास काँग्रेस – जेडीएस सरकारला कोणताही धोका नसणार आहे. त्यामुळे काँग्रेसनं आपली संपूर्ण ताकद आता रामलिंग रेड्डी यांची मनधरणी करण्यावर केंद्रीत केली आहे. सरकार टिकवण्यासाठी किमान 3 दिवसांचा अवधी आहे. त्यामुळे कर्नाटकमधील राजकीय घडामोडी अत्यंत रंजक अशा वळणार आहे. काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाळ बंगळूरूमध्ये दाखल झाले आहेत.

भाजपला सत्ता स्थापनेची संधी

कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेची हुकलेली संधी भाजपच्या जिव्हारी लागली आहे. विधानसभेच्या 224 जागांपैकी काँग्रेसकडे 78, जेडीएस 37, बसपा 1, अपक्ष 2, भाजप 105 आणि अन्य 1 अशी आकडेवारी आहे. दरम्यान, 11 आमदारांचा राजीनामा स्वीकार केल्यास सदस्यसंख्या 210 होईल. त्यामुळे बहुमताचा आकडा हा 113 ऐवजी 106 होईल. काँग्रेस – जेडीएसकडे 104 आमदार आहेत. त्यांना बहुमतासाठी 2 जागा कमी पडतील. तर, भाजपाकडे 105 जागा असल्यानं त्यांना केवळ 1 आमदाराची गरज आहे. त्यामुळे भाजपला सरकार स्थापनेची संधी या ठिकाणी सर्वाधिक आहे. पण, पुढील 3 दिवस हे कर्नाटकाच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत.

VIDEO: नाणेघाटातील अद्भूत निसर्गाचं सौंदर्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 7, 2019 09:01 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...