karnataka: सरकार कोसळले, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला; पुढे काय?

karnataka: सरकार कोसळले, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला; पुढे काय?

अखेर कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकार 14 महिन्यात कोसळले.

  • Share this:

बेंगळुरू, 23 जुलै: अखेर कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकार 14 महिन्यात कोसळले. विधानसभेत मंगळवारी झालेल्या बहुमत चाचणीत कुमारस्वामी यांना बहुमत सिद्ध करता आले नाही. कुमारस्वामी यांनी सादर केलल्या विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 99 तर विरोधात 105 मते पडली. सरकार पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेत राजीनामा सादर केला. तसेच नव्या मुख्यमंत्र्यांची नियुक्त होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची विनंती कुमारस्वामी यांना करण्यात आली.

जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकार कोसळल्यानंतर भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.एस.येडियुरप्पा लवकरच सत्ता स्थापनेचा दावा करतील आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील. येडियुरप्पा यांनी याआधी 3 वेळा मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. पुढील दोन दिवसात भाजपकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाऊ शकतो. दरम्यान बहुमत चाचणीत कुमारस्वामी यांचा पराभव केल्यानंतर कर्नाटक भाजपने त्यांच्या अधिकृत ट्विटवरून 'गेम ऑफ कर्मा' असे ट्विट केले.

कुमारस्वामी सरकार कोसळले; भाजपचे ऑपरेशन लोटस यशस्वी!

पक्षाकडून करण्यात आलेल्या दुसऱ्या एका ट्विटमध्ये हा कर्नाटकच्या जनतेचा विजय आहे. एक अपवित्र आघाडी आणि भ्रष्ट्राचारी युगाचा अंत आहे. आम्ही कर्नाटकातील जनतेला एक स्थिर आणि समर्थ सरकार देऊ. तसेच राज्याला पुन्हा एकदा समृद्ध करू.

14 महिन्यात कोसळले

कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकार 116 आमदारांच्या जोरावर 14 महिने चालले. 1 जुलै रोजी काँग्रेसच्या दोन आमदारांनी राजीनामे दिल्यानंतर सरकार अस्थिर होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर अन्य आमदारांनी देखील राजीनामे दिले आणि बंडखोरांची संख्या 15वर पोहोचली. अल्पमतात असलेल्या सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी होत असताना 18 जुलै रोजी बहुमत चाचणी घेण्याचे ठरले. पण सभागृहात आणि बाहेर सुरु असलेल्या राड्यामुळे सहाव्या दिवशी विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्यात आले.

Published by: Akshay Shitole
First published: July 23, 2019, 9:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading