Home /News /national /

'काँग्रेसच्या जाळ्यात अडकून मी जनतेचा विश्वास गमवला', कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

'काँग्रेसच्या जाळ्यात अडकून मी जनतेचा विश्वास गमवला', कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

काँग्रेससोबत युती करून चूक केली. त्यांच्यासोबत हातमिळवणी करायला नको होती असं देखील कुमारस्वीमी यावेळी म्हणाले.

    नवी दिल्ली, 06 डिसेंबर : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि JDSचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी शनिवारी काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे. काँग्रेससोबत हातमिळवणी करून युती सरकार स्थापन केलं खरं मात्र मी 12 वर्षांपासून जनतेचा माझ्यावर असलेला विश्वास गमवला असा खेद व्यक्त केला. कुमारस्वामी यांच्या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली असून राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. काँग्रेसनं षड्यंत्र आखलं आणि त्यात अडकल्याचं कुमारस्वामी यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस नेते सिद्धरामैय्या यांनी कट रचून अडकवल्याचा गंभीर आरोप देखील कुमारस्वामींनी केला आहे. भाजपनेही एवढी मोठी कधी फसवणूक केली नाही जेवढी काँग्रेसनं केली असंही कुमारस्वामी यावेळी म्हणाले. दक्षिण भारतात कुमारस्वामी विरुद्ध सिद्धरामैय्या अशा आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी पाहायला मिळाल्या. कुमारस्वामी 'खोटे बोलण्यात' माहिर आहेत आणि भावुक होऊन अश्रू वाहणं ही त्यांची जुनी सवय असल्याची बोचरी टीका सिद्धरामैय्या यांनी यावेळी कुमारस्वामींवर केली आहे. 2006-07 मध्ये मी निवडणूक जिंकून जनतेचा विश्वास मोठ्या कष्टानं मिळवला होता. 12 वर्ष हा विश्वास जनतेनं माझ्यावर दाखवला. पण मी काँग्रेससोबत युती केल्यानंतर जनतेच्या या विश्वासाला तडा गेल्याचं कुमारस्वामी यांनी सांगितलं. हे वाचा-Covid 19 Pfizer-BioNTech vaccine : भारतात आपात्कालीन वापरासाठी मागितली परवानगी काँग्रेससोबत युती करून चूक केली. त्यांच्यासोबत हातमिळवणी करायला नको होती असं देखील कुमारस्वामी यावेळी म्हणाले. पक्षश्रेष्ठीमुळे युती सरकार स्थापनेवर सहमती दर्शविली होती. 2018 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत एकाच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही, तेव्हा एकमेकांविरूद्ध लढलेल्या काँग्रेस-जेडी (एस) ने एकत्र येऊन सरकार स्थापन केले आणि कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं. कुमारस्वामी यांच्या आरोपांवर टीका करत सिद्धरामय्या म्हणाले, “कुमारस्वामी खोटे बोलण्यात पटाईत आहेत, ते राजकारणासाठी परिस्थितीनुसार खोटे बोलू शकतात.” जेडीएसला केवळ 37 जागा मिळाल्या तरीसुद्धा त्यांना मुख्यमंत्रिपदी बसवून आमची चूक झाली का? असा सवाल देखील सिद्धरामय्या यांनी उपस्थित केला आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Karnataka

    पुढील बातम्या