बंगळुरू,ता.19 मे: बहुमताचा आकडा जुळवण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरल्यानं कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना अखेर राजीनामा दिला. काँग्रेस आणि जेडिएसचे आमदार गळाला लागणार नाहीत हे स्पष्ट झाल्यानंतर सभागृहात बहुमत घेत नाचक्की करून घेण्यापेक्षा येडियुरप्पांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
विधानसभेचं कामकाज जेव्हा दुसऱ्यांदा सुरू झालं तेव्हा येडियुरप्पांनी भावनात्मक केलं आणि शेवटी राजीनामा देण्याची घोषणा केली. दिल्लीतूनही राजीनामा देण्याची सूचना येडियुरप्पांना करण्यात आली होती. येडियुरप्पांना फक्त चार दिवस मुख्यमंत्रीपदावर राहता आलं. येडियुरप्पा हे कर्नाटकचे औटघटकेचे मुख्यमंत्री ठरले.
येडियुरप्पांनी गुरूवारी राज्याचे 23 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यानंतर राजकीय नाट्याला सुरूवात झाली. काँग्रेसनं जेडीएसला पाठिंबा देत पहिल्या टप्प्यात भाजपवर मात केली. नंतर येडियुरप्पांनीही राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. राज्यपालांनी मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रित करत बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली.
राज्यपाल वजुभाई वाला यांच्या निर्णया विरोधात काँग्रेसनं सुप्रिम कोर्टात धाव घेतली. सुप्रिम कोर्टात पहाटे तीन वाजेपर्यंत दोन्ही पक्षांनी घनघोर युक्तिवाद केला आणि सुप्रिम कोर्टानं भाजपला दणका देत बहुमत सिद्ध करण्यासाठी फक्त दोन दिवसांची मुदत दिली.
तर साम-दाम-दंड वापरून आठ आमदार गळाला लागतात का याची चाचपणी भाजपनं सुरू केली. तर आधीच तयारीत असलेल्या काँग्रेस जेडीएसनं सर्व आमदारांभोवती भक्कम संरक्षक भिंत उभारत त्यांना हैदराबादमध्ये सुरक्षित ठेवलं आणि भाजपचा डाव फसला. कर्नाटकमधल्या राजकीय नाट्याचा दुसरा अंक संपला असून आता तिसऱ्या अंकाला सुरवात होणार आहे.
Karnataka CM BS Yeddyurappa resigns ahead of #FloorTest. pic.twitter.com/dea9HMotx6
— ANI (@ANI) May 19, 2018
Bengaluru: BJP's BS Yeddyurappa reaches Raj Bhavan after resigning as Chief Minister of Karnataka. pic.twitter.com/CkmQokODy3
— ANI (@ANI) May 19, 2018
Bengaluru: Congress' DK Shivkumar, JD(S)'s HD Kumaraswamy & other MLAs at Vidhana Soudha after resignation of BJP's BS Yeddyurappa as Chief Minister of Karnataka. pic.twitter.com/qdGu8zGXWK
— ANI (@ANI) May 19, 2018
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा