कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसची दिवाळी, फक्त शिमोग्यात भाजपचा झेंडा

कर्नाटकमध्ये 3 लोकसभा आणि 2 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या आहेत. मंगळवारी 6 नोव्हेंबरला या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 6, 2018 03:34 PM IST

कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसची दिवाळी, फक्त शिमोग्यात भाजपचा झेंडा

कर्नाटक, 06 नोव्हेंबर :  कर्नाटकमध्ये 3 लोकसभा आणि 2 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या आहेत. मंगळवारी 6 नोव्हेंबरला या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. काँग्रेस-जेडीएसच्या गठबंधनाची ही लिटमस टेस्ट मानली जात होती कारण यात भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या पोटनिवडणुकांमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. कारण 5 पैकी 4 जागा काँग्रेस-जेडीएसने जिंकल्या आहेत.

कर्नाटकच्या बेल्लारी लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेस-जेडीएस उमेदवार बीएस उग्रप्पा यांनी 2 लाखांपेक्षा जास्त मतांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे काँग्रेस-जेडीएसच्या कार्यकर्त्यांनी मोठा उत्साह साजरा केला आहे. तर जमखंडी विधानसभेच्या मतदारसंघातदेखील काँग्रेसने बाजी मारली आहे.

काँग्रेसच्या आनंद न्यामागौडा यांनी जमखंडीमध्ये आपली ताकद दाखवत विजय मिळवला आहे. तर रामनगर विधानसभेमध्ये मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची पत्नी अनिता कुमारस्वामी यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजपने 5 पैकी फक्त 1 जागेवर आपला शिक्का उमटवला आहे.

शिमोगा लोकसभा जागेवर भाजपच्या बीवाय राघवेंद्र यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजपसाठी प्रतिष्ठेची असलेली ही पोटनिवडणुक त्यांना महागात पडली असं म्हणायला हरकत नाही. तर मांड्या लोकसभा मतदारसंघात जेडीएसने विजय मिळवला आहे.

शनिवारी झालेल्या मतदानात जवळपास 67 टक्के मतदान झालं. या पोटनिवडणुकांचा परिणाम थेट 2019 निवडणुकांमध्ये दिसणार आहे. त्यामुळे कर्नाटकमधली भाजपची हवा आता कुठे कमी झालेली पाहायला मिळाली.

Loading...

दरम्यान, जनार्दन रेड्डी यांच्या अमानवी वक्तव्यांवर बेल्लारीच्या जनतेने सडेतोड उत्तर दिलं आहे असं ट्विट माजी मुख्यमंत्री सिद्धारमय्य यांनी केलं आहे.

कर्नाटकच्या शिवमोगा, बेल्लारी आणि मांड्या लोकसभा मतदारसंघ तर रामनगर आणि जामखंडी विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान झालं होतं.

5 जागांच्या 6,450 मतदान केंद्रांवर मतदानाची पात्रता असलेल्या लोकांची एकूण संख्या 54,54,275 होती. निवडणूकीच्या मैदानात एकूण 31 उमेदवार उतरले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 6, 2018 09:27 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...