अपात्र ठरवलेल्या आमदाराच्या संपत्तीत 18 महिन्यात 185 कोटींची वाढ!

अपात्र ठरवलेल्या आमदाराच्या संपत्तीत 18 महिन्यात 185 कोटींची वाढ!

कर्नाटकमधील पोटनिवडणुकीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे.

  • Share this:

बेंगळुरू, 17 नोव्हेंबर: कर्नाटक(Karnataka) मध्ये पुढील महिन्यात विधानसभेच्या 15 जागांवर पोटनिवडणुका (by-election) होत आहेत. भारतासारख्या देशात पोटनिवडणुका हा एक नेहमीचा भाग ठरतो. पण यावेळी कर्नाटकमधील पोटनिवडणुकीने मात्र संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. या पोटनिवडणुकीच्या निकालावर राज्यातील भाजपची सत्ता राहणार की जाणार याचा फैसला होणार आहे. या पोटनिवडणुकीत भाजपने 6 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला तर त्यांची सत्ता टिकणार आहे. काही महिन्यांपूर्वी काँग्रेस आणि जेडीएस मधील 17 आमदारांनी बंडखोरीकरत कुमारस्वामी सरकार पाडले होते. तेव्हा विधानसभा अध्यक्षांनी या आमदारांना अपात्र ठवले होते. आता सर्वोच्च न्यायालयाने या आमदारांना निवडणूक लढण्यास परवानगी दिली आहे. या 15 आमदारांपैकी एक आमदार सध्या देशभरात चर्चेत आला आहे.

राज्यातील होस्कोटे मतदारसंघातून भाजप(BJP)चे उमेदवार असलेले एम.टी.बी नागराज (MTB Nagaraj)यांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी संपत्ती 1 हजार 223 कोटी इतकी असल्याचा उल्लेख केला आहे. याआधी काँग्रेस-जेडीएस (Congress-JDS)सरकारमध्ये सहकार मंत्री राहिलेल्या नागराज यांच्या संपत्तीत 18 महिन्यात 185 कोटी इतकी वाढ झाली आहे. नागराज यांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल 2018मध्ये त्यांची संपत्ती 1 हजार 063 कोटी इतकी होती. आता ती 1 हजार 223 कोटी इतकी झाली आहे.

भाजपचे प्रवक्ते मधू सुदना यांनी सांगितले की, नागराज देशातील श्रीमंत राजकीय नेत्यांपैकी एक आहेत. नागराज प्रत्येक निवडणुकीत पत्नी आणि कुटुंबीयांची संपत्ती जाहीर करतात. 66 वर्षीय नागराज बेंगळुरू ग्रामीणमधील विधानसभा मतदारसंघातून 3 वेळा आमदरा झाले आहेत. कुमारस्वामी सरकारमध्ये त्यांच्याकडे गृहनिर्माण खाते होते. कुमारस्वामी सरकारविरोधात बंडखोरी केल्याबद्दल विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी नागराज यांना अपात्र ठरवले होते. राज्यातील काँग्रेस-जेडीएसमधील 17 आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे कुमारस्वामी सरकार अल्पमतात आले होते आणि त्यांना भाजप सरकार सत्तेत आले.

Published by: Akshay Shitole
First published: November 17, 2019, 12:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading