कर्नाटकच्या भाजप सरकारचं आज ठरणार भवितव्य!

कर्नाटकच्या भाजप सरकारचं आज ठरणार भवितव्य!

बहुमत मिळवून स्थिर सरकार चालविण्यासाठी येडुरप्पांना या 7 जागा जिंकणं महत्त्वाचं आहे. कारण काठावरचं बहुमत असलं तर कर्नाटकात कायम अस्थिरता बघायला मिळते.

  • Share this:

बंगळुरू 09 डिसेंबर : कर्नाटकमध्ये असलेल्या मुख्यमंत्री येडुरप्पा यांच्या भाजप सरकारचं भवितव्य आज (सोमवार 9 डिसेंबर) ठरणार आहे. विधानसभेच्या 15 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज होणार असून त्यातल्या किमान 7 जागांवर विजय मिळवणं बहुमतासाठी येडुरप्पा यांना आवश्यक आहे. अनेक दिवस रंगलेल्या नाट्यानंतर कर्नाटकातलं कुमारस्वामी यांचं सरकार कोसळलं होतं आणि त्यानंतर येडुरप्पा यांनी पुन्हा एकदा सत्ता मिळवली होती. काँग्रेस-जनता दलाचे संयुक्त सरकार 17 आमदारांच्या बंडामुळे पडले होते. या आमदारांनी राजीनामे देत या सरकारचा पाठिंबा काढून घेतला. या आमदारांना तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरविले होते. आमदार अपात्र ठरल्याने रिक्त झालेल्या 15 मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक झाली. सोमावरी या निवडणुकीसाठी मतमोजणी होत आहे. सत्ताधारी भाजपसाठी ही पोटनिवडणूक सर्वात जास्त महत्त्वाची असून, किमान सहा जागा जिंकल्याशिवाय येडियुरप्पा सरकार टिकू शकणार नाही. त्यामुळे निकालाकडे येडियुरप्पा सरकारचं लक्ष लागलं आहे. आधिच भाजपच्या हातून मोठी आणि महत्त्वाची राज्य गेल्यामुळे आता कर्नाटकात काय होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा- सत्ता नाट्यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच आले एकत्र

5 डिसेंबरला या 15 जागांवर मतदान झालं होतं. 67.91 एवढी मतदानाची टक्केवारी होती. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरूवात होईल आणि काही तासांमध्येच निकाल जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. हायकोर्टात सुनावणी असल्यामुळे दोन जागांवर पोटनिवडणूक झाली नव्हती. येडुरप्पा सरकारने 29 जुलैला विश्वासदर्शक ठराव जिंकला होता.

कर्नाटक विधानसभेत एकूण जागा 225 आहेत. मात्र त्यातल्या 17 सदस्यांना अपात्र ठरवल्यामुळे सख्या 208वरच आली होती. कर्नाटक विधानसभेत भाजपला 105, जेडीएसला 34 तर काँग्रेसला 66 जागा आहेत. निवडणुकीनंतर झालेल्या एक्झिट पोल्समध्ये भाजप सर्वाधिक जागा जिंकेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

हेही वाचा-पंतप्रधान मोदींनी केला कार्यक्रमात बदल, हॉस्पिटलमध्ये घेतली अरुण शौरींची भेट

त्यामुळे बहुमत मिळवून स्थिर सरकार चालविण्यासाठी येडुरप्पांना या 7 जागा जिंकणं महत्त्वाचं आहे. कारण काठावरचं बहुमत असलं तर कर्नाटकात कायम अस्थिरता बघायला मिळते. भाजपला बहुमतापासून काहीच जागा कमी होत्या त्यामुळे काँग्रेसने जेडीसला समर्थन दिलं आणि कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले. मात्र हे सरकार फार काळ टिकलं नाही.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

First published: December 9, 2019, 6:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading