धावत्या बसने अचानक घेतला पेट, लहान बाळासह 4 जणांचा होरपळून मृत्यू; 27 जखमी

धावत्या बसने अचानक घेतला पेट, लहान बाळासह 4 जणांचा होरपळून मृत्यू; 27 जखमी

ही बस बंगळूरहून विजयापुराकडे जात असताना अचानक चित्रदुर्ग महामार्गावर बसला आग लागली. आगीच्या वेळी बसमध्ये 32 प्रवासी होते.

  • Share this:

चित्रदुर्ग, 12 ऑगस्ट : कर्नाटकात एक भयंकर घटना घडली. कर्नाटकातील चित्रदुर्गा येथे एका खासगी बसला आग लागली. ही आग एवढी भयंकर होती की यात एका बाळासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 27 जण जखमी झाले आहे. ही बस बंगळूरहून विजयापुराकडे जात असताना अचानक चित्रदुर्ग महामार्गावर बसला आग लागली. आगीच्या वेळी बसमध्ये 32 प्रवासी होते.

या अपघातात मृत्यू झालेल्या पाच जणांमध्ये दोन मुलं आणि एक महिलेचाही समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, इंजिनला आग लागण्याचे कारण सांगितले जात आहे. हिरियूरच्या एसपी राधिका यांनी अपघाताची माहिती घेतली.

जखमी झालेल्या 27 जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक पोलिसांनी एफआयआर नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

(सविस्तर वृत्त लवकरच)

Published by: Priyanka Gawde
First published: August 12, 2020, 9:36 AM IST
Tags: bus fire

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading