बंगळुरू 11 नोव्हेंबर: कर्नाटक (Karnataka) मधल्या भाजपच्या एका आमदाराने आपल्याच पक्षाच्या महिला नगरसेविकेला धक्काबुक्की केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. महालिंगपूरा नगर परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाग घेण्यावरून हा प्रकार घडला. भाजपचे आमदार सिद्दू सावदी यांनी आपल्याच पक्षाच्या नगरेविकेला मतदानाला जाण्यापासू अडविण्याचा प्रयत्न केला. तीन दिवसांपूर्वीची ही घटना असल्याचं सांगितलं जात आहे.
सावदी हे टेराल्डचे आमदार आहेत आणि कर्नाटक हँडलूम डेव्हलपमेंट कॉरर्पोरेशन लिमिटेड (केएचडीसी)चे अध्यक्षही आहेत. भाजपच्या नगरसेविका सविता हुरकादली, चांदनी नायक आणि गोदावरी बाट यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी देण्याची मागणी केली होती. मात्र स्थानिक नेत्यांनी त्यांची मागणी फेटाळून लावली होती.
त्यानंतर नगरसेविका आणि आमदारांमध्ये वाद झाला. हे आमदार त्या नगरसेविकेला मतदानाला येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे.
.@BJP4Karnataka MLA from Terdal manhandles & physically pushes a woman member of Mahalingpur municipal council in Bagalkote. Brazen assault by leader & his supporters after women members said they would vote for Congress in President & VP elections on Wednesday pic.twitter.com/sHymKyMr4S
— Anusha Ravi Sood (@anusharavi10) November 11, 2020
आता या आमदाराविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे. आपल्या पक्षाच्या नगरसेविकाला ज्या प्रकारे या आमदारांनी वागणूक दिली त्याबद्दल भाजपच्या नेत्यांनीही नापसंती व्यक्त केली आहे.