आघाडी सरकारमध्ये होते मंत्री आता भाजप उमेदवार, संपत्ती वाचून तुम्ही थक्क व्हाल

आघाडी सरकारमध्ये होते मंत्री आता भाजप उमेदवार, संपत्ती वाचून तुम्ही थक्क व्हाल

निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये भाजप उमेदवाराने गेल्या 18 महिन्यांत 160 कोटींची वाढ झाल्याचं म्हटलं आहे.

  • Share this:

बेंगळुरू, 17 नोव्हेंबर : कर्नाटकातील होस्कोटे विधानसभा मतदार संघातून भाजप उमेदवारी एमटीबी नागराज निवडणूक लढवत आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाला त्यांच्या एकूण संपत्तीची माहिती दिली आहे. निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात भाजपच्या या उमेदवाराने त्यांच्याकडे 1233 कोटी रुपये इतकी संपत्ती असल्याचं सांगितलं आहे. काँग्रेस-जेडीएस यांच्या आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या नागराज यांच्या संपत्तीत गेल्या 18 महिन्यांत 160 कोटींची वाढ झाली आहे.

नागराज यांनी संपत्तीची माहिती दिली त्यानुसार एप्रिल 2018 पर्यंत त्यांची संपत्ती 1063 कोटी इतकी होती. सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरवल्यानंतर निवडणूक लढवण्यासाठी परवानगी मिळाल्यानंतर आता 5 डिसेंबरला होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढत आहेत.

बेंगळुरु ग्रामीण जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून नागराज तीनवेळा आमदार झाले आहेत. काँग्रेस-जेडीएस सरकारमध्ये ते हाउसिंग मिनिस्टर होते. पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांना कर्नाटक विधानसभेच्या सभापतींनी अपात्र ठरवलं होतं. नागराज हे त्या 17 आमदारांपैकी एक आहेत ज्यांनी काँग्रेस-जेडीएस सरकारशी बंडखोरी केली होती.

कर्नाटकातील 15 विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस-जेडीएसच्या 17 आमदारांना अपात्र ठरवलं होतं. त्या जागांवार पोटनिवडणूक होत आहे.

Published by: Suraj Yadav
First published: November 17, 2019, 8:01 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading