आता 21 राज्यांमध्ये फडकणार भाजपचा झेंडा

आता 21 राज्यांमध्ये फडकणार भाजपचा झेंडा

देशातील भाजप-शासित राज्यांमध्ये पाहता, 16 राज्यांच्या भाजपचे मुख्यमंत्रिपदी आहेत आणि 5 राज्यांमध्ये भाजपा मित्रपक्षांसोबत सत्ता गाजवतेय.

  • Share this:

15 मे : त्रिपुरा निवडणुकांनंतर आता भाजपने कर्नाटकातही आपल्या विजयाचा झेंडा रोवला आहे. त्रिपुरा निवडणुकांच्या आधी भाजपने आसाममध्ये विजयी सलामी दिली होती. त्यामुळे देशातील भाजप-शासित राज्यांमध्ये पाहता, 16 राज्यांच्या भाजपचे मुख्यमंत्रिपदी आहेत आणि 5 राज्यांमध्ये भाजपा मित्रपक्षांसोबत सत्ता गाजवतेय.

आतापर्यंत या 21 राज्यांमध्ये भाजपचे मुख्यमंत्री

अरुणाचल प्रदेश, आसाम ,छत्तीसगड, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपुर, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत.

तर इतर 5 राज्यांमध्ये मित्रपक्षांसोबत भाजप सत्तेमध्ये आहे. यात

- आंध्रप्रदेश (तेलगू देशम पार्टीसोबत युती),

- बिहार (संयुक्त जनता दल),

- जम्मू आणि काश्मीर (जम्मू आणि कश्मीर पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी, जम्मू आणि कश्मीर पीपुल्स कॉन्फ्रेंससोबत युती),

- नागालँड (नागा पीपुल्स फ्रंट),

- सिक्कीम (सिक्किम डेमोक्रेटिक फ्रंटसोबत युती) या राज्यांचा समावेश आहे.

तर दुसरीकडे त्रिपुरा आणि आसाममध्ये भाजप स्वबळावर सरकार चालवत आहे. आता कर्नाटकमध्येही भाजप स्वबळावरच सरकार चालवण्याची चिन्ह आहेत.

संबंधित बातम्या

कर्नाटकात कमळ उमलले, काँग्रेसचं पानिपत

कर्नाटक निवडणुकीतले महत्त्वाचे मुद्दे

कर्नाटकाचा कल भाजपच्या बाजूने येताच शेअर बाजारात 370 अंकांची उसळी

काँग्रेसची धुळधाण, प्रियांका गांधींची पुन्हा मागणी

 

First published: May 15, 2018, 12:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading