कर्नाटकात भाजप ठरला सर्वात मोठा पक्ष

कर्नाटकात भाजप ठरला सर्वात मोठा पक्ष

20 राज्यात भाजपचा झेंडा फडकावणाऱ्या भाजपसाठी अखेर दक्षिणेतलं द्वार मोकळे झाले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेसचा धुव्वा उडवत बहुमताचा आकडा पार केलाय.

  • Share this:

कर्नाटक, 15 मे :  20 राज्यात भाजपचा झेंडा फडकावणाऱ्या भाजपसाठी अखेर दक्षिणेतलं द्वार मोकळे झाले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेसचा धुव्वा उडवत सर्वात मोठा पक्ष ठरला. 'मोदी गो बॅक' म्हणणाऱ्यांना कर्नाटकी जनतेनं 'मोदी वेलकम' करून सणसणीत चपराक लगावली.

आक्रमक प्रचार, योग्य नियोजनाच्या बळावर भाजपने दक्षिणेत मोठा विजय मिळवलाय. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला काँग्रेसने आघाडी घेतली. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात आनंदाचं वातावरण पसरलं होतं. पण काही जागांवरच भाजप मागे होतं. मतमोजणीच्या दोन तासांनंतर भाजपने मुसंडी मारली आणि आघाडी घेतली. तर दुसरीकडे काँग्रेसला टक्कर देत जेडीएसनेही 38 जागांवर जिंकल्यात. कुमारस्वामी यांनी तर 40 हुन जास्त जागा मिळाल्या तर मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकणार अशी घोषणाच करून टाकली. त्यामुळे कर्नाटक त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली. काँग्रेसनेही जेडीएसला पाठिंबा जाहीर केला.

पण, आकडेवारी बदलली आणि चित्र साफ झालं. भाजपने 100 जागांचा आकडा पार केला.भाजपने 104 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला.

2013 च्या निवडणुकीत भाजपने 40 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसने 122 जागा जिंकून एकहाती सत्ता राखली होती. यावेळी भाजपच्या दुप्पटीने जागा वाढल्यात. तर काँग्रेसच्या अर्ध्याने जागा कमी झाल्यात. राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतरही पहिलीच निवडणूक होती. पण या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय.

मोदी लाट ओसरली असं म्हणणाऱ्या विरोधकांच्या शिडीतून कर्नाटकात विजय मिळवून भाजपने हवा काढून घेतलीये. 2019 च्या लोकसभा निवडणुकीची चाचणी परीक्षा भाजपने पास करून विरोधकांना अजून चांगला अभ्यास करा असा संदेशच आजच्या विजयातून दिलाय.

संबंधित बातम्या

 कर्नाटकात 70 टक्क्यांच्यावर मतदान, आता प्रतिक्षा निकालांची!

 'या' दोघांनी लावली कर्नाटकच्या निकालावार 51 हजाराची पैज

कर्नाटकातलं मतदान संपताच जेडीएस नेते कुमारस्वामी गेले सिंगापूरला!

कर्नाटकात सापडली 9746 बनावट मतदार ओळखपत्रं, भाजप, काँग्रेसचे आरोप-प्रत्यारोप

 ...तर 2019मध्ये मी पंतप्रधान बनू शकतो - राहुल गांधी

नुसत्या भाषणांनी पोट भरत नाही, सोनिया गांधींची नरेंद्र मोदींवर टीका

बेळगावात असादुद्दीन ओवैसी यांनी बांधला भगवा फेटा

मोदी खोटं बोलतात,सिद्धरामय्यांनी ठोकला 100 कोटींचा मानहानीचा दावा

 

First published: May 15, 2018, 11:20 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading