मराठी बातम्या /बातम्या /देश /Karnataka Assembly Election Date 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, तारखा जाहीर

Karnataka Assembly Election Date 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, तारखा जाहीर

Karnataka Assembly Election Date 2023: केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या.

Karnataka Assembly Election Date 2023: केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या.

Karnataka Assembly Election Date 2023: केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या.

बंगळुरु, 29 मार्च : कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचं बिगुल आज वाजलं. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. राज्यातील निवडणुकीसाठी मतदान एकाच दिवशी होणार आहे. दहा मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. २० एप्रिल पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असणार आहे

पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्या २०१८ च्या तुलनेत ९.१७ लाखांनी वाढलीय. १ एप्रिल रोजी १८ वर्षे पूर्ण झालेल्यांना कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदान करता येणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.

भारतात पहिल्यांदाच खटल्याच्या सुनावणीवेळी चॅट जीपीटीचा वापर, जामीन अर्जावर दिला निर्णय

कर्नाटक विधानसभेत एकूण २२४ जागा आहेत. सध्या भाजपचे ११७ आमदार आहेत. तर काँग्रेसचे ६९ आणि त्यांच्या सहकारी पक्ष जदयूचे ३२ आमदार आहेत. कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ २४ मे रोजी संपुष्टात येणार आहे. कर्नाटकात २०१८ मध्ये २७ मार्च रोजी विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली होती. त्या निवडणुकीत भाजपने १०४ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसने ८० आणि जदयूने ३७ जागांवर बाजी मारली होती.

काँग्रेसने १२४ उमेदवार केले जाहीर

निवडणूक आयोगाने तारखा जाहीर करण्याआधीच काँग्रेसने त्यांच्या १२४ उमेदवारांची यादी जारी केली आहे. यामध्ये सिद्धरामय्या यांना वरुणा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. पाच वर्षांनी ते पुन्हा घरच्या मतदारसंघात परतणार आहेत. सिद्धरामय्या हे २००८ आणि २०१३ मध्ये वरुणा विधानसभा मतदारसंघातून जिंकले होते. तर २०१३ मध्ये मुख्यंमंत्री असताना ते याच मतदारसंघाचे प्रतिनिधी होते.

First published:
top videos

    Tags: Karnataka Election, Karnataka Government, Karnataka News