मोदींच्या 4 सभा, राहुल गांधींचा रोड शो, कर्नाटकात आजही प्रचाराची रणधुमाळी

मोदींच्या 4 सभा, राहुल गांधींचा रोड शो, कर्नाटकात आजही प्रचाराची रणधुमाळी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आता प्रचाराची रणधुमाळी टीपेला पोहचली आहे. आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत.

  • Share this:

09 मे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आता प्रचाराची रणधुमाळी टीपेला पोहचली आहे. आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत. कर्नाटकच्या या दौऱ्यांमध्ये प्रचार सभा कमी पण आरोप-प्रत्यारोप जास्त होते, त्यामुळे निवडणुका तोंडावर आल्या असतानाही आज हे दोघे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या आज 4 सभा होणार असून बंगारपेट, चिकमंगळूर, बिदर, आणि बेळगावमध्ये या सभा होणार आहेत तर दुसरीकडे राहुल गांधीही बेंगलोरच्या दौऱ्यावर असून बेंगलोर शहरांमध्ये आणि परिसरात त्यांची रोडशो करणार आहेत.

कालच्या सभांमध्ये मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती काँग्रेस फुटीच राजकारण करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं तर दुसरीकडे सोनिया गांधी यांनीही मोदींच्या भाषणाने पोट भरत नाही, कर्नाटकच्या बाबतीत गेल्या काही वर्षात केंद्र सरकारने पक्षपात केला असा आरोप सोनिया गांधी यांनी केला होता.

राहुल गांधी यांनीही 2019साली मीच पंतप्रधान होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं त्यामुळे आजचा दिवसही आरोप-प्रत्यारोपांनी गाजण्याची शक्यता आहे. एकीकडे महाराष्ट्र एकीकरण समिती मार्फतही प्रचाराचा वेग वाढला असून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनाच निवडून देण्याचे आवाहन समितीमार्फत करण्यात आले आहे.

 

First published: May 9, 2018, 9:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading