S M L

अमित शहा म्हणाले, "येडियुरप्पा सरकार भ्रष्टाचारात नंबर वन!"

जर भ्रष्टाचाराची स्पर्धा घेतली तर येडियुरप्पा सरकाराचा (भाजप) यात पहिला नंबर येईल"

Sachin Salve | Updated On: Mar 27, 2018 07:08 PM IST

अमित शहा म्हणाले,

नवी दिल्ली, 27 मार्च : राजकारणात बोलताना जरा जपूनच बोलावं लागतं जर चुकूलं तर टीकेचं धनी व्हावं लागतं. आता तर भाजपचेच राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी अशीच एक चुकू केलीये. त्यांनी आपल्या येडियुरप्पा सरकार भ्रष्टाचारात नंबर वन असल्याचं जाहीर करून टाकलं.

कर्नाटक निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत अमित शहा यांची जीभ घसरली. अमित शहा म्हणाले, "सुप्रीम कोर्टाचे एक निवृत्त न्यायाधीशाने अलीकडेच म्हटलंय की, जर भ्रष्टाचाराची स्पर्धा घेतली तर येडियुरप्पा सरकाराचा (भाजप) यात पहिला नंबर येईल". अमित शहा बोलून तर गेले पण लगेच त्यांच्या शेजारी बसलेले भाजपचे प्रवक्त्याने  त्यांची चुकू लक्षात आणून दिली. पण तोपर्यंत उशीर झाला होता.

Loading...
Loading...

अमित शहा यांच्या चुकीचा काँग्रेसच्या हाती आयतं कोलीत लागलं. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी  शहा अखेर सत्य बोललं असं म्हणत त्यांनी अमित शहांचा व्हिडिओ टि्वट केला.

तर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुद्धा अमित शहांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली. येडियुरप्पा सरकारला भ्रष्टाचारी असल्याचं सांगून अमित शहांनी आमच्या प्रचाराला चांगली सुरुवात करून दिली असा टोला राहुल गांधींनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 27, 2018 07:08 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close