Elec-widget

केंद्राच्या इंधन कपातीच्या निर्णयाला दोन राज्यांचा नकार

केंद्राच्या इंधन कपातीच्या निर्णयाला दोन राज्यांचा नकार

  • Share this:

नवी दिल्ली, 04 आॅक्टोबर : इंधनदरवाढीवर केंद्र सरकारने दिलासा देत अडीच रुपयांची कपात केलीये.तसंच राज्य सरकारलाही अबकारी करात कपात करण्याची सुचना दिली होती. त्यानुसार पाच राज्यात इंधनाचे दर कमी करण्यात आले आहे. मात्र, भाजपची सत्ता नसलेल्या कर्नाटक आणि केरळने अर्थमंत्री अरूण जेटलींच्या सुचनेला केराची टोपली दाखवलीये.

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दुपारी पत्रकार परिषद घेऊन अडीच रुपयांची कपात करणार असल्याची घोषणा केली. तसंच इतर राज्यांनाही अबकारी करात इतकीच कपात करण्याची सुचना दिली. त्यामुळे इंधनाच्या दरात 5 रुपये कपात झालीये.

पण कर्नाटक आणि केरळने अर्थमंत्र्यांच्या निर्णयाला नकार दिलाय. 'आम्ही मागील महिन्यातच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दोन रुपयांची कपात केली होती. केंद्राने निर्णय घेण्याआधीच आम्ही हा निर्णय घेतला होता त्यामुळे नव्याने कपात करण्याची गरज नाही असं कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी स्पष्ट केलं.

जुलै महिन्यात पेट्रोल-डिझेलवर 2 टक्के सेस वाढवण्यात आला होता. कर्नाटक सरकारने शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. बंगळुरूमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर हे 84.76 आणि 75.93 रुपये आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी इंधनाच्या टॅक्समध्ये अडीच रूपयांची कपात केल्यानं नागरिकांना थोडा दिलासा मिळाला. आता राज्यांनीही आपल्या करांमध्ये कपात करावी असं आवाहन त्यांनी केलं होतं. त्याल प्रतिसाद देत काही राज्यांनीही केंद्र सरकारप्रमाणच अडीच रूपयांनी टॅक्स कमी केला. त्यामुळं त्या राज्यांमध्येही आता पाच रूपयांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार आहेत.

Loading...

टॅक्स कमी करणारी राज्यं आहेत महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, त्रिपरा, गुजरात आणि मध्यप्रदेश. ही सर्व पाचही राज्य ही भाजप शासीत असल्याने भाजपने काँग्रेसवर निशाना साधलाय. मध्यरात्रीपासून या किंमती स्वस्त होणार असल्यानं नागरिकांना तात्पुरता का होईना दिलासा मिळालाय.

====================================================

गीता गोपिनाथ : देशानं दुर्लक्ष केलेली गुणवान भारतीय अर्थतज्ज्ञ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 4, 2018 08:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...