• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • PWD च्या कनिष्ठ अभियंत्याच्या घरावर एसीबीची धाड; पाईपलाईनमध्ये सापडली रोकड, VIDEO

PWD च्या कनिष्ठ अभियंत्याच्या घरावर एसीबीची धाड; पाईपलाईनमध्ये सापडली रोकड, VIDEO

कनिष्ठ अभियंता शांता गौडा (PWD Junior Engineer Shanta Gowda) यांच्या घरातील पाईपलाईनमध्ये रोकड आढळून आली आहे

 • Share this:
  बंगळुरू 24 नोव्हेंबर : कर्नाटकातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एसीबीच्या अधिकाऱ्यांनी PWD च्या एका कनिष्ठ अभियंत्याच्या घरी धाड टाकली (Karnataka ACB Raid). या धाडीत कनिष्ठ अभियंता शांता गौडा (PWD Junior Engineer Shanta Gowda) यांच्या घरातील पाईपलाईनमध्ये रोकड आढळून आली आहे (Money in the Pipeline). ही घटना कर्नाटकाच्या कलबुर्गी येथील आहे. एसीबीने शांता गौडा यांच्या घरी धाड टाकली असता पाईपलाईनमध्ये पैसे आढळून आले. काठीच्या सहाय्याने या पाईपलाईनमधून पैसे बाहेर काढण्यात आले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओदेखील समोर आला आहे. यात काही कर्मचारी पाईपलाईनमधून पैसे बाहेर काढत असून खाली एका बादलीमध्ये ते पैसे जमा करत आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: