Home /News /national /

बहिणीसोबतच्या रिलेशनशिपमुळे भडकला मुस्लीम भाऊ, 25 वर्षीय तरुणाची केली हत्या

बहिणीसोबतच्या रिलेशनशिपमुळे भडकला मुस्लीम भाऊ, 25 वर्षीय तरुणाची केली हत्या

कर्नाटकातील (Karnataka) कलबुर्गी जिल्ह्यात (Kalburgi district) एका आंतरधर्मीय व्यक्तीची (Hindu man) हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केलीय.

    कर्नाटक, 27 मे: कर्नाटकातील (Karnataka) कलबुर्गी जिल्ह्यात (Kalburgi district) एका आंतरधर्मीय व्यक्तीची (Hindu man) हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केलीय. या कारवाई दरम्यान पोलिसांकडून 19 वर्षीय मुलाला अटक करण्यात आली आहे. सोमवारी रात्री 25 वर्षीय विजया कांबळे (Vijaya Kamble) याच्यावर वार करून लोखंडी रॉडने हत्या करण्यात आली. गेल्या वर्षभरात आंतरधर्मीय संबंधांवरून हत्येची ही तिसरी घटना आहे. विजय याचं एका वेगळ्या धर्माच्या मुलीवर प्रेम होते. यातूनच त्याची हत्या करण्यात आली. विजया हा जिल्ह्यातील वाडी शहरातील भीमा नगर ले-आउट येथील रहिवासी होता. या घटनेबाबत कलबुर्गी पोलीस अधीक्षक ईशा पंत यांनी सांगितलं की, या प्रकरणातील संशयित शहाबुद्दीन आणि नवाज या दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पंत पुढे म्हणाले की, विजया हा शहाबुद्दीनच्या बहिणीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. कुटुंबात या प्रेमसंबंधाबद्दल सर्वच समजलं होतं. मात्र आंतरधर्मीय संबंधामुळे कुटुंबात नाराजी होती. या नाराजीमुळे शहाबुद्दीनने त्याची हत्या केली. सोमवारी रात्री केली हत्या कलबुर्गी एसपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 8.30 च्या सुमारास वाडी रेल्वे स्थानकाजवळील एका पुलाजवळ ही घटना घडली. त्या रात्री शहाबुद्दीन आणि नवाज यांना विजय रेल्वे पुलावर दिसला, त्यानंतर तिघांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी त्याच्यावर चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. Weather Updates: पावसाविषयी IMD चा नवा अंदाज काय?, जाणून घ्या एसपी म्हणाले की, विजयाच्या मानेवर आणि डोक्यावर जखमेच्या अनेक खुणा आढळून आल्या आहेत. त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणाच्या आतापर्यंतच्या तपासात हा हल्ला पूर्वनियोजित होता असे आढळून आले आहे, मात्र ते या घटनेबाबत अधिक पुरावे गोळा करत आहेत. कलबुर्गी जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली या घटनेनंतर कलबुर्गी जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. या घटनेचे वृत्त सोशल मीडियावर पसरल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी वाडी शहरात बंदोबस्त वाढवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील काही संवेदनशील भागात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रेल्वे रुळावर मुस्लिम तरुणाचा मृतदेह आढळून आला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यात एका 24 वर्षीय मुस्लिम तरुणाचा कुजलेला मृतदेह रेल्वे ट्रॅकवर सापडला होता. तरुणाच्या हत्येप्रकरणी महिलेच्या पालकांसह 10 जणांना अटक करण्यात आली होती. यानंतर 28 सप्टेंबर 2021 रोजी अरबाज मुल्लाचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली होती. बेपत्ता झाल्यानंतर तीन दिवसांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला बेळगाव येथे अरबाज आफताब मुल्लाची हत्या झाल्यानंतर एक महिन्यापेक्षा कमी कालावधीनंतर, सिंदगी येथील बालगनूर गावात राहणाऱ्या रवी निंबर्गी या मुस्लीम महिलेच्या कुटुंबाने कथितपणे त्याची हत्या केली होती. निंबर्गी हे 21 ऑक्टोबर 2021 रोजी बेपत्ता झाले होते. तीन दिवसांनी त्याचा मृतदेह विहिरीतून सापडला. या घटनेत पोलिसांनी महिलेच्या लहान भावासह दोघांना अटक केली होती.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Crime, Hindu, Karnataka, Murder, Muslim

    पुढील बातम्या