कर्नाटकातील हाय व्होल्टेज ड्रामा आज संपण्याची शक्यता, कुमारस्वामी सरकारची अग्निपरीक्षा

कर्नाटकातील राजकीय नाट्य गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. या राजकीय नाट्यात आता नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 22, 2019 09:01 AM IST

कर्नाटकातील हाय व्होल्टेज ड्रामा आज संपण्याची शक्यता, कुमारस्वामी सरकारची अग्निपरीक्षा

संदीप राजगोळकर, बंगळुरू, 22 जुलै : कर्नाटकातील कुमारस्वामी सरकारची आज पुन्हा एकदा अग्निपरीक्षा असणार आहे. तब्बल दोन वेळा राज्यपालांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्यानंतर आज सकाळी 11 वाजता पुन्हा एकदा कुमारस्वामी हे विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत.

कर्नाटकातील राजकीय नाट्य गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. या राजकीय नाट्यात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. कारण जेडीएसकडून काँग्रेसच्या सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रिपद दिलं जाईल, अशी चर्चा काँग्रेसच्या गोटात सुरू होती. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडू राव यांनी ही चर्चा फेटाळली आहे. या अफवा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

'कुमारस्वामी हेच मुख्यमंत्री राहतील आणि आम्ही आज भाजपचे पानिपत नक्की करू,' असं दिनेश गुंडू राव यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आज बंगळुरूमधल्या विधानसभेत नेमकं काय होणार याकडे देशाचे लक्ष लागलं आहे.

दरम्यान, कर्नाटकमधील सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. विधानसभा अध्यक्षांनी अद्याप बंडखोर आमदारांच्या संदर्भात निर्णय घेतलेला नाही. आमदारांच्या राजीनाम्यासंदर्भात कोर्टने दिलेल्या आदेशामुळे आधीच कुमारस्वामी यांना झटका बसला आहे. त्यामुळे कर्नाटक विधानसभेत आज नेमक्या काय हालचाली होतात, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

आदित्य ठाकरेंची यात्रा म्हणजे प्रशांत किशोर कन्सल्टंसीचे प्रॉडक्ट

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 22, 2019 09:01 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...