संकटमोचकांनी एअरपोर्टपर्यंत केला पाठलाग पण आमदारांचं विमान गेलं उडून

संकटमोचकांनी एअरपोर्टपर्यंत केला पाठलाग पण आमदारांचं विमान गेलं उडून

संकटमोचक मानले जाणारे कर्नाटकचे ज्येष्ठ काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांना अपक्ष नेते नागेश मुंबईला जात असल्याची खबर मिळाली. त्यांनी एअरपोर्टपर्यंत त्यांचा पाठलाग केला. पण तोपर्यंत नागेश यांनी विमानात चेक इन केलं होतं!

  • Share this:

बंगळुरू, 9 जुलै : संकटमोचक मानले जाणारे कर्नाटकचे ज्येष्ठ काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांना अपक्ष नेते नागेश मुंबईला जात असल्याची खबर मिळाली. त्यांनी एअरपोर्टपर्यंत त्यांचा पाठलाग केला. पण तोपर्यंत नागेश यांनी विमानात चेक इन केलं होतं!

कर्नाटकमधल्या राजकीय नाट्यात हे एअरपोर्टवरचं पाठलाग नाट्य घडलं. नागेश विमानातून मुंबईला निघून गेले तेव्हा डी. के. शिवकुमार यांनी अत्यंत दु:खी स्वरात प्रसारमाध्यमांना सांगितलं, मी नागेश यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण भाजपवाले जबरदस्तीने त्यांना मुंबईला घेऊन गेले.

कर्नाटक सरकार संकटात

कर्नाटक सरकारवरचं संकट अजून कायमच आहे. दोन अपक्ष आमदारांनी काँग्रेस आणि जेडीएस यांच्या आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेत राजीनामे दिले. एच. नागेश आणि आर. शंकर हे राजीनाम्यानंतर राज्यपालांना भेटले आणि त्यांनी आपला पाठिंबा भाजपला असल्याचं त्यांना सांगितलं. त्यानंतर काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांनी त्यांचा पाठलाग केला. पण 5 मिनिटांची चुकामुक झाली आणि नागेश यांच्या विमानाने उड्डाणही केलं.

आऊट गोईंग सुरूच, राष्ट्रवादीचे आणखी एक आमदार करणार शिवसेनेत प्रवेश

एच. नागेश हे कोलार जिल्ह्यातल्या मुलबगल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांच्या विजयामध्ये शिवकुमार यांची महत्त्वाची भूमिका होती. पण आता मात्र शिवकुमार यांना गुंगारा देत ते भाजपच्या तंबूत निघून गेले.

आमदारांची मनधरणी

2018मध्ये काँग्रेस – जेडीएसनं सत्ता स्थापन केली. त्यानंतर अवघ्या 13 महिन्यात आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे काँग्रेस – जेडीएस सरकार अस्थिर झालं. या आमदारांच्या मनधरणीचा प्रयत्न देखील झाला. पण, आपल्या राजीनाम्यावर मात्र 14 आमदार ठाम आहेत. पण, विधानसभा अध्यक्षांनी 14 आमदारांचे राजीनामे अद्याप स्वीकारले नाहीत.

===========================================================================

VIDEO : 'माझ्या हत्येसाठी 25 लाखांची सुपारी दिली होती'

First published: July 9, 2019, 5:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading