कर्नाटकी गोंधळ : आता या तारखेला होणार कुमारस्वामी सरकारची बहुमत चाचणी

कर्नाटकी गोंधळ : आता या तारखेला होणार कुमारस्वामी सरकारची बहुमत चाचणी

कर्नाटकमध्ये अजूनही वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडतायत आणि सरकारवरची टांगती तलवारही कायम आहे. एकीकडे बंडखोर आमदारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही तर दुसरीकडे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना भाजप विश्वासदर्शक ठरावामध्ये बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगतं आहे.

  • Share this:

बंगळुरू, 15 जुलै : कर्नाटकमध्ये अजूनही वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडतायत आणि सरकारवरची टांगती तलवारही कायम आहे. एकीकडे बंडखोर आमदारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही तर दुसरीकडे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना भाजप विश्वासदर्शक ठरावामध्ये बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगतं आहे.

याच घडामोडींमध्ये माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सिद्धरामैया यांनी विधानसभा अध्यक्ष रमेश यांच्याशी चर्चा केली. आता कुमारस्वामी सरकारला 18 जुलैला म्हणजे गुरुवारी विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जावं लागणार आहे.भाजपने कुमारस्वामी यांच्याकडे ही मागणी लावून धरली होती.सिद्धरामय्या जर बहुमत सिद्ध करू शकले तर सरकारवरचा धोका टळू शकतो. पण यात अपयश आलं तर बी. एस.येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकमध्ये भाजपचं सरकार बनू शकतं.

बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या नेत्यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली. कुमारस्वामी सरकारने बहुमत सिद्ध करावं, अशी त्यांची मागणी होती. बंडखोर आमदारांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाल्यानंतर याबद्दल निर्णय घेऊ, असं रमेश कुमार यांनी त्यांना सांगितलं होतं.

World Cup : न्यूझीलंडनेच जिंकलायं वर्ल्ड कप! वाचा ICCचा नियम क्रमांक 19.8

16 बंडखोर आमदारांच्या या याचिकेवर सुप्रीम कोर्टात 16 जुलैला, मंगळवारी सुनावणी आहे.भाजपचे आमदार सुरेश कुमार यांच्या मते, पहिल्यांदा कुमारस्वामी सरकारने बहुमत चाचणीमध्ये संख्याबळ सिद्ध करून दाखवावं. त्यानंतरच दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष वळवता येईल. आमच्यासोबत 105 आमदार आहेत,असा दावाही त्यांनी केला.

===============================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 15, 2019 03:31 PM IST

ताज्या बातम्या