कर्नाटकात काँग्रेसला पहिला धक्का; असंतुष्ट आमदाराने पक्ष सोडला

कर्नाटकात काँग्रेसला पहिला धक्का; असंतुष्ट आमदाराने पक्ष सोडला

गेल्या काही दिवसांपासून अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. याआधीच काँग्रेसमधील अनेक आमदार पक्ष सोडून भाजपमध्ये जातील, असा अंदाज बांधण्यात येत होता.

  • Share this:

बंगळुरू, 6 मार्च : कर्नाटक राज्यात अजूनही भाजप आणि काँग्रेसमध्ये संघर्ष सुरूच आहे. गुलबर्ग्याचे आमदार डॉ. उमेश जाधव यांनी विधानसभा सभापती के. आर. रमेशकुमार यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे प्राथमिक सदस्यत्वही त्यांनी सोडले आहे. लवकरच ते भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

कर्नाटकमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. याआधीच काँग्रेसमधील अनेक आमदार पक्ष सोडून भाजपमध्ये जातील, असा अंदाज बांधण्यात येत होता. अशातच आता काँग्रेसबाहेर पडणारे उमेश जाधव हे पहिले असंतुष्ट आमदार ठरले आहेत. पाठोपाठ लवकरच गोकाकचे आ. रमेश जारकीहोळी आणि बळ्ळारीचे आ. नागेंद्र राजीनामा देणार असल्याची माहिती मिळाली आहे.

मंत्रिपदावरून डच्चू आणि बेळगावातील राजकारणात बंगळुरातील काही नेत्यांकडून होत असलेल्या हस्तक्षेपाचा निषेध करून रमेश जारकीहोळी यांनी राजीनामा देण्याची तयारी केली होती. सुमारे दोन महिने ते मुंबईत होतला होता. त्यांच्यासमवेत त्यावेळी डॉ. जाधवही होते.

अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी समन्वय समितीचे अध्यक्ष सिद्धरामय्या यांनी व्हीप जारी केला होता मात्र अधिवेशन आणि विधिमंडळ बैठकीला अनुपस्थित राहणार्‍यांवर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत कारवाईचे संकेत त्यांनी दिले होते. त्यानंतरही अधिवेशन संपण्यास दोन दिवस असताना नाराज आमदार विधानसभा सभागृहात दाखल झाले. गुलबर्गा येथून काँग्रेस नेते मल्‍लिकार्जुन खर्गे यांच्या विरोधात भाजपकडून डॉ. जाधव यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात येणार आहे.

SPECIAL REPORT : सेनेच्या खासदाराने काढली अमोल कोल्हेंची जात!

First published: March 6, 2019, 7:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading