BREAKING : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनाही कोरोनाची लागण; रुग्णालयात केलं दाखल

आज गृहमंत्री अमित शहा यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे

आज गृहमंत्री अमित शहा यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे

  • Share this:
    बंगळुरु, 2 ऑगस्ट : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज देशाचे गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशचे भाजप अध्यक्षांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने मोठी भीती व्यक्त केली जात आहे. त्यातच कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांना कोविड -19 ची लागण झाल्याचे वृ्ृत समोर आले आहे, त्यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की - मी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलो आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. यादरम्यान माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ला क्वारंटाइन करावं आणि निरीक्षण करावं.
    Published by:Meenal Gangurde
    First published: