साखर कारखान्यात भीषण स्फोट; 6 जण ठार

कर्नाटकाती भाजपचे माजी मंत्री मुरुगेश निराणी यांचा बागलकोट तालुक्यातील साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटात 6 जण ठार, तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Dec 16, 2018 04:02 PM IST

साखर कारखान्यात भीषण स्फोट; 6 जण ठार

बागलकोट, 16 डिसेंबर : कर्नाटक राज्यातील बागलकोट तालुक्यात एक भीषण दुर्घटना घडली आहे. तालुक्यातील मुधोळ येथील साखर कारखान्यातील बॉयलरचा स्फोट झाला असून, त्यात 6 जण ठार तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत.


बागलकोट तालुक्यातील मुधोळ येथे भाजपचे माजी मंत्री मुरुगेश निराणी याचा साखर कारखाना आहे. या साखर कारखान्यात रविवारी दुपारच्या सुमारास बॉयलरचा भीषण स्फोट झाला. अचानक झालेल्या या स्फोटाची तिव्रता इतकी होती की, आसपासचा परिसर हादरून गेला. बागलकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात उसाचं पिक घेतलं जातं. उसाचे गाळप काढण्याचा काम सद्या सुरु असल्याने रविवारी अनेक मजूर कारखान्यात कामावर हजर होते.


दरम्यान, कारखान्यात गाळप यंत्रणा कार्यरत असताना रविवारी दुपारच्या सुमारास अचानक कारखान्यातील बॉयलरमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटात बॉयलरजवळ काम करणाऱ्या 6 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. अचानक झालेल्या या स्फोटामुळे संपूर्ण मुधोळ गाव हादरलं. स्फोटाची तीव्रता अधिक असल्यामुळे या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या साखर कारखान्यात एक हजाराहून अधिक कामगार आहेत.

Loading...


भाजपचे माजी मंत्री मुरुगेश निराणी यांचा या साखर कारखान्यातील बॉयलर नेमकं कशामुळे फुटलं याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तुर्तास जखमी झालेल्यांना बागलकोट येथील रुग्णालायत दाखल करण्यात आलं आहे. तर, मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती मिळाल्याने त्यांनी आर्त टाहो फोडला. घटनेची माहिती मिळताच मुरुगेश निराणी घटनास्थळी पोहोचले. कर्नाटकचे मुखमंत्र्यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला असून, स्फोटाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.


कारखान्यात ज्या ठिकाणी बॉयलर होतं, स्फोटामुळे तेथल्या भिंती अगदी नेस्तनाबूत झाल्या आहेत. तर लोखंडी साहित्यांची प्रचंड प्रमाणात पडझड झाली आहे. अजुनही ढिगाऱ्याखाली कोणी अडकलं आहे का हे स्पष्ट होत नसल्याने क्रेनच्या सहाय्याने कारखान्याचा मलबा हटविण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.


PHOTO : हा.. हू... करत कोल्हापूरकरांनी फस्त केली झणझणीत मिसळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 16, 2018 03:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...