Home /News /national /

Kargil युद्धाला 22 years पूर्ण; एका मेंढपाळामुळे भारतानं हरलेलं युद्ध जिंकलं, नेमकं काय घडलं?

Kargil युद्धाला 22 years पूर्ण; एका मेंढपाळामुळे भारतानं हरलेलं युद्ध जिंकलं, नेमकं काय घडलं?

Kargil Vijay Diwas: 22 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी 26 जुलै 1999 रोजी भारतानं कारगिल युद्धात पाकिस्तानला धुळ चारली होती. एका मेंढपाळामुळे भारतानं हरलेलं युद्ध जिंकलं होतं.

    नवी दिल्ली, 26 जुलै: 22 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी 26 जुलै 1999 मध्ये भारतानं कारगिल युद्धात पाकिस्तानला धुळ चारली होती. त्या दिवसापासून दरवर्षी 26 जुलै हा दिवस 'कारगील विजयी दिवस' म्हणून साजरा केला जातो. दोन महिने चाललेल्या या युद्धात भारतीय सेनेनं दाखवलेले शौर्य आणि कर्तृत्वाचे प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटला पाहिजे. 18 हजार फूट उंचीवर लढण्यात आलेल्या या युद्धात देशाचे जवळपास 527 जवान शहीद झाले होते, तर 1300 हून अधिक जवान जखमी झाले होते. पाकिस्तानने 3 मे 1999 रोजी या युद्धाची सुरूवात केली होती. यादिवशी पाकिस्ताननं कारगिलच्या पर्वतांवर 5 हजाराहून अधिक सैन्य पाठवले होते. पाकिस्तानच्या सैनिकांनी गुप्त पद्धतीनं भारतात घुसखोरी केली होती. पाकिस्तानी सैनिक भारतात घुसखोरी करत असल्याचं एका मेंढपाळानं पाहिलं होतं. यानंतर त्यानं याची माहिती भारतीय सैन्यांना दिली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी सैनिकांनी घुसखोरी केल्याचा भारतीय सैन्यांना थांगपत्ताही नव्हता. पण मेंढपाळानं माहिती दिल्यानंतर भारतीय जवान सतर्क झाले. याची माहिती भारत सरकारला मिळाल्यानंचर सैन्यांनी पाकिस्तानी सैनिकांना रोखण्यासाठी ऑपरेशन विजयची घोषणा केली. पाकिस्तानच्या तिजोरीत खडखडाट, ड्रोन हल्ल्यांमागचं खरं कारण तत्पूर्वी, मेंढपाळानं दिलेली माहिती किती खरी आणि किती खोटी याची शाहनिशा करण्यासाठी सैन्याची एक तुकडी पर्वता पलिकडे गेली होती. तेव्हा पाकिस्तानी सैन्यांनी केलेली तयारी पाहून भारतीय सैन्यांना देखील धक्का बसला होता. पाकिस्तानी सैनिकांनी भारताचा खूप मोठा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला होता. सियाचिन ग्लेशियरचा प्रदेश ताब्यात घेण्याचा त्यांचा मनसुबा होता. पण एका मेंढपाळानं भारतीय सैन्यांना गुप्त माहिती दिल्यानं पाकिस्तानी सैन्यांचा हा मनसुबा हाणून पाडण्यात आला. पण हे ऑपरेशन वाटतंय तितकं सोपं नक्कीचं नव्हतं. कारण पाकिस्तानचे सैनिक पर्वताच्या वरच्या बाजूला होते. तर भारतीय सैन्य खालच्या बाजूला होते. त्यामुळे लक्ष्य भेदण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. पण भारतीय सैन्यांनी हार मानली नाही, सलग दोन महिने लढा देत पाकिस्तानला चारी मुंड्या चित केलं होती. प्रतिकुल परिस्थिती असताना भारतानं पाकिस्तानवर मात केली होती. MH FYJC CET 2021: आजपासून पुन्हा सुरु होतंय CET रजिस्ट्रेशन, वाचा डिटेल्स 3 मे रोजी युद्धाची ठिणगी पडल्यानंतर, भारतीय सैन्यांच्या ताब्यात बोफोर्स तोफा आल्या, यानंतर खऱ्या अर्थानं बाजी पलटली. भारतीय सैन्यानं बोफोर्स तोफांच्या मदतीनं पाकिस्तानी बंकरला टार्गेट केलं. यामुळे पाकिस्तानला या प्रतिहल्ल्यापासून सावरणं अवघड होऊन बसलं आणि 26 जुलै 1999 रोजी भारतानं हरलेली बाजी पलटवली. भारतानं पाकिस्तानला तिसऱ्यांदा धुळ चारली. याच दिवसाची आठवण म्हणून आज 'कारगील विजयी दिवस' साजरा केला जातो.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: शहिदांना श्रद्धांजली. Kargil war

    पुढील बातम्या