या कारणांमुळे लढणार नाही करिना लोकसभेची निवडणूक!

या कारणांमुळे लढणार नाही करिना लोकसभेची निवडणूक!

  • Share this:

मुंबई 22 जानेवारी : बॉलीवूडची बेबो करिना कपूर लोकसभेची निवडणूक लढणार का? याची जोरदार चर्चा गेली दोन दिवस प्रसारमाध्यमांमध्ये सुरू होती. करिना भोपाळमधून काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढणार असल्याचं बोललं जात होतं. त्यावर करिनाने आता आपली प्रतिक्रिया दिली आहे. पतौडी घराण्याची सून असलेल्या करिनाला निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची इच्छा नाही.

सोशल मीडियावर करिनाची बातमी व्हायरल झाली आणि सगळ्यांनी करिनाकडे प्रतिक्रियेसाठी धाव घेतली. मात्र एक दिवस शांत राहिल्यानंतर तिने आता आपल्या प्रतिक्रिया दिली आहे. करिना म्हणते, " माझ्याकडे सध्या चित्रपटांची भरपूर काम आहेत. हे काम एवढं आहे की सध्या मला दुसरं काही करायला वेळच नाही "

काय आहे काँग्रेस नेत्यांची मागणी?

करिना कपूर यांचे सासरे आणि माजी क्रिकेटपटू नवाब मंसूर अली खां पतौडी यांना काँग्रेसने 1991 मध्ये लोकसभेसाठी तिकिट दिलं होतं आणि राजीव गांधी त्यांच्या प्रचारासाठी आलेही होते. मात्र या निवडणुकीत पतौडींचा पराभव झाला होता. तोच धागा पकडून आता काँग्रेसचे स्थानिक नेते करिनाला तिकिट देण्याची मागणी करत आहेत.

भोपाळमधले काँग्रेसचे नगरसेवक गुड्डू चौहान हे यासाठी प्रयत्न करत आहे. काही नगरसेवकांचा गट तयार करून त्यांनी ही मागणी रेटून धरली आहे. याबाबतचं निवेदन त्यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांनाही दिलं आहे.

करिनाचं राहुल प्रेम!

ही चर्चा सुरू असताना करिनाच्या मुलाखतीचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल झालाय. 2002मध्ये सीमी गरेवाल यांनी करिना कपूरची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीत सीमी गरेवाल यांनी करिनाला प्रश्न विचारला होता की, तुला कुठल्या सेलिब्रेटिसोबत डेटवर  जायला आवडेल?

या प्रश्नावर करिनाने जे उत्तर दिलं त्या उत्तराने सीमी गरेवाल यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. उत्तर देताना करिना म्हणाली, "मी उत्तर देऊ किंवा नको असं झालंय. मी उत्तर दिलं तर ते वादातही सापडू शकते, पण माझं उत्तर आहे, राहुल गांधी. त्यांचे काही फोटो मी इंडिया टुडेमध्ये बघितले आहेत. मला ते आवडले. ते राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घराण्यातून आले आहेत. तर मी चित्रपटांची पार्श्वभूमी असलेल्या घराण्यातून. त्यामुळे मला नक्कीच त्यांना डेटवर घेऊन जायला आवडेल."

बॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार? बघा Special Report

First published: January 22, 2019, 1:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading