करिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक?

करिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक?

युवा मतदारांची संख्या जास्त असल्याने करिनाला उमेदवारी दिल्यास त्याचा फायदा होईल असं काँग्रेसला वाटतं.

  • Share this:

भोपाळ 20 जानेवारी : मध्य प्रदेशात विधासभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर काँग्रेसमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आता लोकसभा निवडणुकीवर काँग्रेसने लक्ष केंद्रीत केलं आहे. भोपाळमध्ये भाजपच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी सुपस्टार करिना कपूरला लोकसभेची उमेदवारी द्या अशी मागणी स्थानिक नगरसेवकांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याकडे केली आहे.

करिना कपूर यांचे सासरे आणि माजी क्रिकेटपटू नवाब मंसूर अली खां पतौडी यांना काँग्रेसने 1991 मध्ये लोकसभेसाठी तिकिट दिलं होतं आणि राजीव गांधी त्यांच्या प्रचारासाठी आलेही होते. मात्र या निवडणुकीत पतौडींचा पराभव झाला होता. तोच धागा पकडून आता काँग्रेसचे स्थानिक नेते करिनाला तिकिट देण्याची मागणी करत आहेत.

भोपाळमधले काँग्रेसचे नगरसेवक गुड्डू चौहान हे यासाठी प्रयत्न करत आहे. काही नगरसेवकांचा गट तयार करून त्यांनी ही मागणी रेटून धरली आहे. याबाबतचं निवेदन त्यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांनाही दिलं आहे.

पतौडी घराण्याचा प्रभाव भोपाळ आणि परिसरात होता. तसच भोपाळमध्ये युवा मतदारांची संख्या जास्त असल्याने करिनाला उमेदवारी दिल्यास त्याचा फायदा होईल असं काँग्रेसला वाटतं.

स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासोबतच दिल्लीतल्या नेत्यांनाही याबाबतचं निवेदन पाठवलं आहे. मात्र करिना कपूरला यासाठी विचरणा केलेली नाही अशी माहितीही चौहान यांनी दिली. स्थानिक नेत्यांची मागणी असली तरी असं तिकिट देण्याची शक्यता फारच कमी असल्याची माहितीही काँग्रेसच्याच काही नेत्यांनी दिली आहे.

First published: January 20, 2019, 8:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading