AIRSTRIKE : भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानी शेअर बाजारही धाडकन कोसळला

AIRSTRIKE : भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानी शेअर बाजारही धाडकन कोसळला

भारतीय वायुसेनेने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तान हादरला आहे. या एअर स्ट्राईकचे परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरही होण्याची चिन्हं आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तान हादरला आहे. या एअर स्ट्राईकचे परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरही होण्याची चिन्हं आहेत. कारण भारताच्या एअर स्ट्राईकची बातमी येताच कराचीचा शेअर बाजार दणकून कोसळला आहे.

मंगळवारी पहाटे भारतीय वायुसेनेच्या मिराज 2000 विमानांनी पाकिस्तानी हवाई हद्दीत प्रवेस करत जैश ए मोहम्मद आणि इतर दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. मंगळवारी सकाळी भारतीय माध्यमांमध्ये ही बातमी आली आणि त्याचे परिणाम शेअर मार्केटवर दिसू लागले.

मंगळवारी कराची स्टॉक एक्सचेंज 364 अंकांनी कोसळला. कराची शेअर बाजारात घसरण आली आणि 39,242.80 अंकावर आला. याउलट भारतीय शेअर बाजारात मात्र तेजी आली आहे. सकाळी बाजार उघडण्याच्या सुमारासच भारताने पाकिस्तानी हद्दीत घुसून केलेल्या एअर स्ट्राईकची बातमी आली. त्याचा शेअर बाजारावर थेट परिणाम लगेच दिसला नाही. सुरुवातीला भारतीय शेअर बाजार काही अंकांनी घसरल्यानंतर काही तासातच सावरला आणि उसळीसुद्धा घेतली.

भारताच्या एअर स्ट्राईकच्या बातम्यांना दुजोरा मिळाल्यानंतर भारतीय शेअर बाजाराने उसळी घेतली तर पाकिस्तानी शेअर बाजार कोसळला.

नेमकं काय झालं?

पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी भारतीय वायु दलाच्या मिराज - 2000 या विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश करत दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यामध्ये 200 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारतीय वायु दलानं केलेल्या कारवाईमुळे दहशतवाद्यांना पळता भूई थोडी झाली. या हल्ल्यामध्ये 5 पाकिस्तानी सैनिक देखील ठार झाले. तर जखमींवर रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. 21 मिनिटं भारतीय हवाई दलानं केलेल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांच्या तळाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं.प्रत्युत्तरादाखल पाकनं भारतीय हवाई दलावर हल्ला केला. पण, भारतीय हवाई दलापुढे त्यांची डाळ शिजली नाही.

संबंधित बातम्या

पाकिस्तानातील या दहशतवादी तळांवर झाला हल्ला; फोटो व्हायरल

IndiaStrikesBack- पाकिस्तानला पलटवार करणं होतं अशक्य, असं होतं भारतीय वायुसेनेचं ‘चक्रव्यूह’

पुलवामा हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी झाला Air Strike चा निर्णय!

First published: February 26, 2019, 2:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading