2जी घोटाळ्याच्या खोट्या आरोपांवर पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यावं - कपिल सिब्बल

त्यामुळे कुठल्या आधारावर 2जी प्रकरणी ते सरकारवर आरोप करत होते याचं स्पष्टीकरण पंतप्रधानांनी द्यावं अशी मागणी सिब्बल यांनी केली आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Dec 21, 2017 01:45 PM IST

2जी घोटाळ्याच्या खोट्या आरोपांवर पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यावं - कपिल सिब्बल

21 डिसेंबर:  2जी घोटाळ्याप्रकरणी कपिल सिब्बल यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. याप्रकरणी  कपिल सिब्बल यांनी भाजप सरकारवर टीका करत त्यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण द्यावं  अशी मागणी केली आहे.

2जी स्पेक्ट्रम प्रकरणानंतर कपिल सिब्बल हे टेलिकॉम मंत्री झाले होते. तेव्हाच कॅगचा अहवाल समोर आला होता. त्यानंतर आपण सगळी कागदपत्र तपासली होती. त्यात काहीच गैर नव्हतं असं मत कपिल सिब्बल यांनी व्यक्त केलं आहे. तसंच तेव्हाही आपण हे सांगितलं होतं पण मीडियाने माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं असं सिब्बल यांनी सांगितलं. खोट्या घोटाळ्यांचा अपप्रचार करून  भाजपनेच एक स्कॅम केला आहे. त्यामुळे कुठल्या आधारावर 2जी प्रकरणी ते सरकारवर आरोप करत होते याचं स्पष्टीकरण पंतप्रधानांनी  द्यावं अशी मागणी सिब्बल यांनी केली आहे.

दरम्यान माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी या निकालाचं स्वागत केलं आहे. तर अण्णा हजारे यांनी  याप्रकरणी सीबीआयने हाय कोर्टात जावं अशी मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय राजकारण होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 21, 2017 01:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...