मुंबई, 12 नोव्हेंबर : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी राज्यपालांवर गंभीर आरोप केले आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर काम करतायत, असं कपिल सिब्बल म्हणाले. राज्यपालांनी 9 नोव्हेंबरपर्यंत सरकारस्थापनेची वाट का पाहिली ? असा सवाल त्यांनी विचारला.
जेव्हा तुम्हाला भाजपचं सरकार हवं असतं तेव्हा तुम्ही वाट पाहू शकता पण जेव्हा दुसऱ्या पक्षाला सरकारस्थापनेची संधी असते तेव्हा मात्र तुम्ही वाट बघत नाही, असा आरोप कपिल सिब्बल यांनी केला. या सगळ्याबद्दल लोक काय म्हणतील आणि कायदेशीर बाबींचं पालन होणार आहे की नाही, असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.
#NewsAlert – As far as Governor in concerned, in any state, Governor is working on behalf of Centre. What was the point of waiting till Nov 9? When you want BJP govt, you can wait, but when it's other party you can't. What will people think & what will happen to law: Kapil Sibal pic.twitter.com/UYX2Xh8wmt
— News18 (@CNNnews18) November 12, 2019
राज्यात आजपासून राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. दरम्यान, शिवसेनेने राज्यपालांच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. कपिल सिब्बल हेच सुप्रीम कोर्टात शिवसेनेची बाजू मांडणार आहेत. शिवसेनेच्या याचिकेवर उद्या न्या. शरद बोबडे यांच्या कोर्टात सुनावणी होणार आहे.
(हेही वाचा : बाबरी मशिदीचे पक्षकार अन्सारी जमीन घ्यायला तयार, सरकारकडे करणार ही मागणी)
=======================================================================================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा