Home /News /national /

Kapil Sibal: काँग्रेसचा 'हात' सोडून कपिल सिब्बल यांची 'सायकल'स्वारी; सपाच्या मदतीने करणार राज्यसभेची वारी

Kapil Sibal: काँग्रेसचा 'हात' सोडून कपिल सिब्बल यांची 'सायकल'स्वारी; सपाच्या मदतीने करणार राज्यसभेची वारी

काँग्रेसचा 'हात' सोडून कपिल सिब्बल यांची 'सायकल'स्वारी; सपाच्या मदतीने रणार राज्यसभेची वारी

काँग्रेसचा 'हात' सोडून कपिल सिब्बल यांची 'सायकल'स्वारी; सपाच्या मदतीने रणार राज्यसभेची वारी

कपिल सिब्बल यांनी आज लखनऊ येथून राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

    नवी दिल्ली, 25 मे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी पक्षाला रामराम केला आहे. काँग्रेसच्या जी-23 मधील प्रमुख बंडखोर असलेल्या कपिल सिब्बल यांनी गुपचूप काँग्रेस पक्ष सोडला. काँग्रेस पक्षातून बाहेर पडत कपिल सिब्बल यांनी समाजवादी पक्षाची वाट धरली आहे. समाजवादी पक्षाच्या पाठिंब्याने कपिल सिब्बल राज्यसभेवर जाणार आहेत. त्यांनी अधिकृतपणे समाजवादी पक्षाचं सदस्यत्व घेतलेलं नाहीये. मात्र, सपाच्या पाठिंब्यावर ते राज्यसभेत दाखल होतील. (Kapil Sibal filed nomination for Rajya Sabha Election with support of SP) अलीकडच्या काळात समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी कपिल सिब्बल यांची जोरदार प्रशंसा केली होती. तेव्हापासून कपिल सिब्बल यांना समाजवादी पक्ष राज्यसभेची उमेदवारी देईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. 16 मे रोजी काँग्रेसचा राजीनामा कपिल सिब्बल यांनी आज लखनऊ येथून राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर त्यांनी सांगितले की, 16 मे रोजी मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यांनी सांगितले की, अपक्ष म्हणून ते पुन्हा एकदा समाजवादी पक्षाच्या मदतीने उत्तरप्रदेशातून राज्यसभेवर जात आहेत. वाचा : राज्यसभेची उमेदवारी हवी असेल तर संभाजीराजेंनी कसं वागावं याचाही ड्राफ्ट ठरलेला? छावा संघटनेचे मोठे गौप्यस्फोट अपक्ष बनत सरकारला घेरणार कपिल सिब्बल यांनी औपचारिकरित्या समाजवादी पक्षात प्रवेश केलेला नाहीये. त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. सपाच्या पाठिंब्याने ते राज्यसभेवर जात आहेत. फॉर्म भरल्यानंतर सिब्बल म्हणाले की, आम्हाला विरोधी आघाडी करायची आहे. उदयपूर चिंतन शिबिराचे निमंत्रण काँग्रेस पक्षाचे नुकतेच राजस्थानमधील उदयपूर येथे चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या चिंतन शिबिराचे निमंत्रण ही कपिल सिब्बल यांना देण्यात आले होते. मात्र, जी-23 चे बंडखोर कपिल सिब्बल तिथे गेले नाहीत. तेव्हापासून ते पक्ष सोडतील अशी चर्चा होती. काँग्रेस नेत्रृत्वाला आव्हान जी-23 हा काँग्रेस पक्षाचा एक गट आहे. या नेत्यांनी गेल्यावर्षी सोनिया गांधींना पत्र लिहून पक्ष नेत्रृत्व आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर उपस्थित केले होते. संघटनेच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्याची मागणी या नेत्यांनी केली होती. यामध्ये कपिल सिब्बल, गुलाम नवी आझाद यांच्यासह अनेक दिग्गज काँग्रेस नेत्यांचा सहभाग होता.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Rajyasabha, Uttar pradesh

    पुढील बातम्या