गँगस्टर विकास दुबेच्या 'त्या' काळ्या बॅगमध्ये दडलंय राज, होऊ शकतो मोठा खुलासा

गँगस्टर विकास दुबेच्या 'त्या' काळ्या बॅगमध्ये दडलंय राज, होऊ शकतो मोठा खुलासा

विकास दुबे पळून जात असताना त्याचा एन्काउंटर करण्यात आला.

  • Share this:

कानपूर, 10 जुलै: पोलिसांची हत्या करणारा गँगस्टर विकास दुबे पोलिसांना चकवा देऊन पळत असताना एन्काउंटरदरम्यान ठार झाला. पोलिसांनी बचावासाठी केलेल्या गोळीबारात विकासला 4 गोळ्या लागल्या आणि त्याचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांची नजर चुकवून विकास दुबे दिल्लीला पळून जात असताना त्याला उज्जैनी इथे महाकाली मंदिरात गुरुवारी पकडण्यात आलं. पोलिसांच्या प्रत्येक हालचाली विकासपर्यंत कशा पोहोचत होत्या आणि त्याला कोण मदत करत होतं याचं गूढ लवकरच उलगडणार आहे.

हे वाचा-नेमकं 6.15 वाजता काय घडलं? वाचा विकास दुबेच्या एन्काउंटरची INSIDE STORY

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विकास दुबेजवळ एक बॅग सापडली आहे. या बॅगेमध्ये काही कपडे, मोबाइल फोन आणि त्याच्या चार्जरसह काही कागदपत्रेही सापडली आहेत. याशिवाय मोबाईल फोनद्वारे विकास कोणाशी संपर्क साधत होता आणि काय बोलणं होत होत याचे तपशील पाहण्याचं काम सध्या पोलीस करत आहेत. यासह विकास दुबे यांच्याकडून बनावट आयकार्डही सापडलं आहे.

गँगस्टर विकास दुबेला अनेक लोक मदत करत असल्याचा संशय पोलिसांना आहे. विकास दुबेनं उत्तर प्रदेश आणि कानपूर पोलिसांना चकवा देऊन पळून गेलेल्या विकास दुबेला कोण पाठीशी घालतंय हे या बॅगेतील दस्तऐवज आणि मोबाईलमधील फोन रेकॉर्डवरून समोर येणार आहे.

मध्य प्रदेशातील उज्जैनी इथे गुरुवारी सकाळी महाकाली मंदिरातून विकास दुबेच्या मुस्क्या आवळण्यात आल्या. संध्याकाळी पोलिसांकडून त्याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर विकास दुबेला उत्तर प्रदेश पोलिसांच्या हवाली करण्यासाठी उज्जैनी इथून कानपूरच्या दिशेनं जात असताना कारला अपघात झाला आणि विकास दुबे पळून जात असताना त्याचा एन्काउंटर करण्यात आला.

Published by: Kranti Kanetkar
First published: July 10, 2020, 11:27 AM IST

ताज्या बातम्या