कानपूर, 25 मे : लॉकडाऊनमध्ये (Lockdown) एकीकडे सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली असली तरी, काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. मात्र तरी लॉकडाऊनमुळे शेकडो विवाह पुढे ढकलण्यात आले आहे. मात्र उत्तर प्रदेशमध्ये एक अजब प्रकार घडला. कानपूरमध्ये एक अनोखा विवाहसोहळा पाहायला मिळाला. लॉकडाऊनमध्ये लग्न करण्यास वरानं नकार दिल्यानंतर वधू स्वत: वरात घेऊन निघाली. संपर्ण परिसर सॅनिटाईज केल्यानंतर मास्क लावून अखेर त्यांचा विवाह झाला.
लॉकडाऊनमध्ये झालेल्या या अनोख्या लग्नाची चर्चा जवळपासच्या गावात होत आहे. मोहनपूर गावात पंचायत प्रमुख वीरेंद्र कुमार यांचे लग्न वेगळ्या पद्धतीनं झालं. सामान्यता नवरा मुलगा वरात घेऊन वधूकडे जातो. मात्र लॉकडाऊनमध्ये त्याची हिम्मत झाली नाही. तर, वधूनं आपल्या आई-वडिलांसह चालत नवरा मुलाचं घर गाठलं. वधुला दारात पाऊन सगळेच चक्रावले. अखेर मोजक्या लोकांसह ठरलेल्या मुहुर्तावर दोघांचा विवाह झाला.
वाचा-लॉकडाऊनमध्ये उडवला लग्नाचा बार; घरी जाण्याऐवजी थेट पोहोचले रुग्णालयात
मंडप आणि संपूर्ण गाव केलं सॅनिटाइज
वधूच्या स्वागतासाठी गावाच्या प्रवेशद्वारापासून मंडपापर्यंत सगळा परिसर सॅनिटाइज करण्यात आला. लग्नाला हजेरी लावलेल्या नातेवाईकांना मास्क देण्यात आले होते. लग्नाला मोजकी लोकं सहभागी झाली होती. एवढेच नाही तर सरपंचांची परवानगी घेऊनच हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
वाचा-लॉकडाऊनमध्ये फुललं प्रेम; अन्नदान करताना भिकारी मुलीच्या प्रेमात पडला आणि...
वाचा-एका लग्नामुळे गाव आलं अडचणीत, क्वारंटाइन सेंटरमधून बाहेर पडलं जोडपं आणि...