'...नाहीतर एकाचा गळा चिरून दुसरा लावू', लाच मागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा VIDEO VIRAL

'...नाहीतर एकाचा गळा चिरून दुसरा लावू', लाच मागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा VIDEO VIRAL

या व्हायरल व्हिडीओमध्ये राकेश चौहान तक्रारदारांना सांगत आहेत की माझ्याकडे सगळ्यावर उपाय आहेत.

  • Share this:

कानपूर, 30 ऑगस्ट : कानपूर पोलीस (Kanpur Police) आणि कुख्यात गुन्हेगार विकास दुबे (Gangster Vikas Dubey) यांच्यातील झालेल्या चकमकीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह आठ पोलीसांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेनं अख्खा देश हादरला होता, यातच आता उत्तर प्रदेश पोलिसाच्या एका व्हिडीओने त्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. या व्हिडीओमध्ये उघैती पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी राकेश चौहान असे सांगताना दिसत आहे की, एखाद्या निर्दोष व्यक्तीला लाच देऊन फसवता येते किंवा कोणाचा गळा चिरून दुसराही लावता येतो.

या व्हायरल व्हिडिओमध्ये राकेश चौहान तक्रारदारांना सांगत आहेत की माझ्याकडे सगळ्यावर उपाय आहे. ज्याप्रमाणे एखाद्याचे सीटी स्कॅन किंवा एमआरआय करतात, तसेत पोलिसांची सेवा की ते सगळं ठीक करतात. तुम्हाला जसे उपचार हवेत तसे होतील. तुम्हाला पाहिजे तर एखाद्याचा गळा चिरून दुसरा लावू शकतो. अवैध दारू, अफू, चरस सर्व काही पोलीस स्टेशन प्रभारीकडे आहे.

वाचा-...आणि 2 किमी गाडीच्या बोनेटवर झोपून आरोपीला पकडलं, पाहा खऱ्या सिंघमचा VIDEO

वाचा-बापरे! लग्न लागत असतानाच वर-वधूवर कोसळली वीज, थरकाप उडवणारा VIDEO VIRAL

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर केली कारवाई

या व्हायरल व्हिडीओमध्ये हा पोलीस अधिकारी नव्या पद्धतीने लाच मागताना दिसतआहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एसएसपी संकल्प शर्मा यांनी तपास केल्यानंतर राकेश चौहान यांना त्वरित निलंबित केले आणि विभागीय कारवाईही सुरू केली आहे. एसएसपी म्हणाले की, तातडीने तपास करण्यात आला असून त्यानंतर कारवाई करण्यात आली आहे. रोकेश चौहान यांनी एक महिन्याआधीच चार्ज स्विकारला होता.

Published by: Priyanka Gawde
First published: August 30, 2020, 11:49 AM IST

ताज्या बातम्या