S M L

भरधाव वेगात डंपर शिरला घरात, घरातल्या 6 जणांचा जागीच मृत्यू

कानपूरमध्ये वाळूने भरलेला डंपर चालवत असताना चालकाचा ताबा सुटला आणि वेगात असलेल्या घरात घुसला.

Renuka Dhaybar | Updated On: Jun 16, 2018 03:50 PM IST

भरधाव वेगात डंपर शिरला घरात, घरातल्या 6 जणांचा जागीच मृत्यू

उत्तर प्रदेश, 16 जून : कानपूरमध्ये वाळूने भरलेला डंपर चालवत असताना चालकाचा ताबा सुटला आणि वेगात असलेल्या घरात घुसला. यामध्ये, भयानक अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने या 6 जणांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पण या सगळ्या प्रकारामुळे परिसरात गोंधळ उडाला आहे.

ही घटना इलाहाबादच्या महामार्गावरील महाराजपूर पोलीस स्थानकाजवळ घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डंपर ड्रायव्हर नशेत होता. त्यामुळे त्याचा ताबा सुटला आणि त्याला गाडीचा वेग आवरता आला नाही.

अपघातानंतर ड्रायव्हरने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर वृद्ध महिलसह घरात झोपलेल्या 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

मोठ्या वेगानं घरात घुसलेला या डंपरनं घराची राख रांगोळी केली. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Loading...
Loading...

 

हेही वाचा...

पोटच्या मुलानेच नारळ पाण्यातून आई-वडिलांना दिलं विष !

VIDEO : संशयाचं भूत,औरंगाबादेत जमावाकडून महिलेसह दोघांना बेदम मारहाण

पानसरे, कलबुर्गी, लंकेश हत्येत एकाच शस्त्राचा वापर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 16, 2018 10:07 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close