कानपूर, 22 जून : शेल्टर होममधील मुलांची कोरोना टेस्ट सध्या करण्यात येत आहे. यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कानपूरच्या स्वरूप नगर बालिका संरक्षण गृहमधील 57 अल्पवयीन मुली कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या असून, त्यांची कोरोना टेस्ट केल्यानंतर यातील 5 मुली गर्भवती असल्याचं समोर आलं आहे. इतरकेच नाही तर कोरोना नेगिटिव्ह आलेल्या 2 अल्पवयीन मुलीही गर्भवती असल्याचं कळलं आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गर्भवती मुलींपैकी एक मुलगी 8 महिन्यांची आणि दुसरी साडे आठ महिन्यांची गरोदर आहे. सध्या दोघांना रुग्णालयाच दाखल करण्यात आलं आहे. तपासणीत एका मुलीला एचआयव्ही असल्याचं आढळून आलं तर दुसर्या मुलीला हेपेटायटीस सी संसर्ग असल्याचं आढळले. यामुळे त्यांना विशेष देखरेखीखाली ठेवले गेले आहे. दरम्यान हे प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण शेल्टर होमची कसून चौकशी केली जात आहे.
वाचा-'समोर बंदूक ठेवून सिनेमासाठी होकार द्यायला लावला',अभिनेत्याचा धक्कादायक अनुभव
शेल्टर होममध्ये आणलं तेव्हाच मुली होत्या गर्भवती
एसएसपी दिनेशकुमार पी यांनी सांगितले की शेल्टर होममध्ये येण्याआधीच या मुली गरोदर होत्या. पाच कोरोना पॉझिटिव्ह अल्पवयीन मुली या आग्रा, एटा, कन्नौज, फिरोजाबाद आणि कानपूरच्या बाल कल्याण समितीच्या परवानगीनंतर इथं राहत होत्या. एसएसपी दिनेश कुमार यांचे म्हणणे आहे की पोक्सो कायद्यांतर्गत एक मुलगी कन्नौज येथे आली होती तर दुसरी आग्राहून कानपूरला आली होती.
वाचा-कोरोनाच्या साथीत पावसाळ्यात इतर आजारांचाही धोका; कसा कराल स्वत:चा बचाव
कुछ लोगों द्वारा कानपुर संवासिनी गृह को लेकर ग़लत उद्देश्य से पूर्णतया असत्य सूचना फैलाई गई है।आपदाकाल में ऐसा कृत्य संवेदनहीनता का उदाहरण है। कृपया किसी भी भ्रामक सूचना को जाँचें बिना पोस्ट ना करें। ज़िला प्रशासन इस संबंध में आव़श्यक कार्रवाई हेतु लगातार तथ्य एकत्र कर रहा है।
— DM Kanpur Nagar (@DMKanpur) June 21, 2020
डीएम म्हणाले...
या प्रकरणात डीएम यांनी ट्वीट करत, काही लोक चुकीच्या हेतूनं कानपूर शेल्टर होमबाबत पूर्णपणे खोटी माहिती पसरवत आहेत. सध्याच्या परिस्थितीत अशी माहिती पसरवणं असंवेदनशीलतेचे उदाहरण आहे. कृपया कोणतीही दिशाभूल करणारी माहिती तपासल्याशिवाय पोस्ट करू नका. जिल्हा प्रशासन यासंदर्भात आवश्यक त्या कारवाईसाठी सातत्याने माहिती गोळा करत आहे.
वाचा-VIDEO : झोपलेलं असताना अचानक पांघरुणात आली मगर, पाहूनच उडाला थरकाप