मराठी बातम्या /बातम्या /देश /कानपूरमधील गोल्डन बाबांचा थाटचं न्यारा! दररोज अंगावर असतं 2 किलो सोनं

कानपूरमधील गोल्डन बाबांचा थाटचं न्यारा! दररोज अंगावर असतं 2 किलो सोनं

कानपूरमधील मनोज सेंगर यांनी सोन्याच्या दागिन्यांची खूप आवड आहे. मनोज सेंगर हे रोज जवळपास 2 किलो सोनं अंगावर परिधान करतात.

कानपूरमधील मनोज सेंगर यांनी सोन्याच्या दागिन्यांची खूप आवड आहे. मनोज सेंगर हे रोज जवळपास 2 किलो सोनं अंगावर परिधान करतात.

कानपूरमधील मनोज सेंगर यांनी सोन्याच्या दागिन्यांची खूप आवड आहे. मनोज सेंगर हे रोज जवळपास 2 किलो सोनं अंगावर परिधान करतात.

कानपूर, 22 फेब्रुवारी : काहींना सोन्याची फारच आवड असते. काही लोकं सोन्याची शौकीन असतात असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. आपण अनेकांना सोन्याने मढलेलं बघत असतो. डोक्यापासून ते पायाच्या बोटापर्यंत सोन्याची आभूषणं त्यांनी घातलेली असतात. अगदी अनेक कलाकारही याला अपवाद नाहीत. गीतकार बप्पी लहिरीही नेहमी सोन्याचे दागिने परिधान केलेले असतात. आणि बप्पी लहिरींना बघून अनेकांना आपणही अशीच वेशभूषा करावी असं वाटतं. आणि अनेकजण तसं करतातही. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये असेच एक गोल्डन बाबा सध्या चर्चेत आहेत.

कानपूरमधील मनोज सेंगर यांनी सोन्याच्या दागिन्यांची खूप आवड आहे. त्यांना कानपूरचे बप्पी लहिरी आणि गूगल गोल्डन बाबा असंही म्हटलं जातं. मनोज सेंगर हे रोज जवळपास 2 किलो सोनं अंगावर परिधान करतात. कानपूरच्या काकादेव येथे राहणारे मनोज सेंगर घरी असताना सामान्य जरी दिसत असले तरी ते बाहेर पडताच गोल्डन बाबा बनतात.

मनोज सेंगर यांनी सांगितलं की, 1988 साली दूरदर्शनवर महाभारत सिरीयल बघितल्यावर त्यांनाही सोनं आणि चांदीच्या दागिन्यांची आवड निर्माण झाली. त्यांना असं वाटतं की, सोनं आणि चांदीचे दागिने घालणं हा क्षत्रियांचा रुबाब आहे. महाभारत बघितल्यानंतर त्यांनी अडीचशे ग्रॅमच्या चार सोन्याच्या चैन बनवून घालायला सुरुवात केली.

मनोज सेंगर गेल्या 10 वर्षांपासून अशाचप्रकारे सोनं घातल आहेत. यासोबत ते स्वत:च्या सुरक्षेसाठी लायसन्स असलेली रिवॉलव्हर ठेवतात. सोन्याप्रती असलेलं हे वेड मनोज यांना लहानपणापासूनच आहे. आणि याच कारणामुळे त्यांना गोल्डन मॅन आणि कानपूरचे बप्पी लहिरी असंही म्हटलं जातं. त्यांच्या चष्म्यापासून बंदुकीचा अर्धा भाग हा सोन्याचा आहे. आणि एवढचं नाही तर त्यांची चप्पलही चांदीची आहे.

सतत सोन्याचे दागिने घालत असल्याने त्यांना अनेकदा जीवे मारण्याची धमकीही मिळाली आणि त्याच्यांवर हल्लाही करण्यात आला. मात्र तरिही त्यांना त्यांचा सोनं घालण्याचा मोह आवरता आला नाही. आता त्यांच्यासोबत नेहमी सुरक्षारक्षही असतात.

First published:
top videos

    Tags: Gold, Kanpur