दारात वरात अन् पहिली बायको मंडपात! लग्न लागण्याआधीच वर पोहचला तुरुंगात

दारात वरात अन् पहिली बायको मंडपात! लग्न लागण्याआधीच वर पोहचला तुरुंगात

मित्र आणि ग्रामस्थ वरातीची तयारी करत होते. मात्र वरात निघण्यापूर्वीच त्यांची प्रेयसी पोलिसांना घेऊन मंडपात पोहचली.

  • Share this:

कानपूर, 02 जुलै : सीआरपीएफमध्ये तैनात जवानाला प्रेम करणं महागात पडलं. ही घटना कानपूरमध्ये घडली. या जवानाचे मंगळवारी लग्न होते, संपूर्ण घर नातेवाईकांनी भरलेले होते. मित्र आणि ग्रामस्थ वरातीची तयारी करत होते. मात्र वरात निघण्यापूर्वीच त्यांची प्रेयसी पोलिसांना घेऊन मंडपात पोहचली.

प्रेयसीने असा आरोप केला आहे सुमितनं आर्य समाजात तिच्याशी लग्न केले होते. कित्येक वर्ष तिचे शारीरिक शोषणही केले. गर्भवती असताना ड्रगद्वारे तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. प्रेयसीनं असेही सांगितले की, पहिली पत्नी असताना दुसरे लग्न कसे करता येईल. प्रेयसीनं केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी वराला अटक केली.

वाचा-तलवारीने केला तरुणाच्या मानेवर वार, नालासोपाऱ्यातला हल्ल्याचा LIVE VIDEO

मंगलपूर पोलिस स्टेशन परिसरात राहणारा मानवेंद्र सिंग यादव हा सीआरपीएफमध्ये हवालदार असून जम्मू-काश्मीरमध्ये तैनात आहे. 2015 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून मानवेंद्र सिंगने कानपूरच्या शिवराजपूर येथे राहणाऱ्या या तरुणीशी मैत्री केली होती. यानंतर मानवेंद्रने तिच्याशी मोबाईलवर बोलण्यास सुरुवात केली आणि ते प्रेमात पडले. या प्रेयसीनं असा आरोप केला की, लग्नाच्या बहाण्याने मानवेंद्रनं 2016 पासून तिच्यावर शारीरिक अत्याचार केले.

वाचा-सुशांतच्या आत्महत्येवेळी घरात होता त्याचा मित्र, पोलिसांकडून पुन्हा एकदा चौकशी

15 लाखांच्या हुंड्यासाठी करत होता लग्न

पीडित तरुणीने सांगितले की, मानवेंद्रने अचानक तिच्याशी फोनवर बोलणं बंद केलं. त्यानंतर तिला कळलं की, मानवेंद्र लग्न करत आहे, कारण त्याला हुंड्यात 15 लाख रुपये मिळत आहेत. पण पहिली पत्नी असताना दुसरं लग्न करणं गुन्हा आहे. म्हणून मी पोलिसांत तक्रार केली.

प्रियकर पोहचला जेलमध्ये

मानवेंद्रच्या घरातून वरात निघणार होती. मात्र त्याआधीच गोंधळ सुरू झाला. पीडित तरुणीनं पोलीस आणि संपूर्ण गावासमोर लग्नाचे प्रमाणपत्र, मोबाइल फोन रेकॉर्डिंग आणि फोटो दाखवले. त्यानंतर पोलिसांनी वराला अटक केली. या हायवोल्टेज ड्रामानंतर मानवेंद्रचे लग्न मोडले. सध्या मानवेंद्रची चौकशी सुरू आहे. अद्याप त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही आहे.

वाचा-VIDEO - बकरीसाठी तरुणाने बोअरवेलमध्ये टाकलं डोकं, मित्रांनी पकडले पाय आणि...

संपादन-प्रियांका गावडे.

First published: July 2, 2020, 10:05 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading