उत्तर प्रदेश, 10 सप्टेंबर: गुरुवारी कानपुरमध्ये (Kanpur) एक विचित्रच घटना घडली. बुरखा (Veil) घातलेला एक तरुण थेट महिला वॉर्डमध्ये (Women's ward) घुसला. कानपूर ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयात ही विचित्र घटना घडली आहे. वॉर्डमध्ये उपस्थित महिलांना संशय आल्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. धक्कादायक म्हणजे बुरखा घातलेला पकडलेली व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून महिला डॉक्टरचा ड्रायव्हर होता.
कानपूर ग्रामीण भागातील अकबरपूर सीएचसी रुग्णालयाचा डॉक्टर गजलाचा ड्रायव्हर रईस बुरखा घालून रुग्णालयाच्या महिला वॉर्डमध्ये दाखल झाला. जेव्हा एका महिलेनं त्याला तिथं पाहिलं तेव्हा तिला संशय आला आणि नंतर धक्कादायक वास्तव उघड झाले की ती महिला नसून तर पुरुष आहे.
बेकरी व्यावसायिकानं घडवली इको फ्रेंडली मूर्ती; चॉकलेटचा गणपती ठरतोय आकर्षण
रुग्णालयातील नर्स आणि महिलांनी त्याला पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी पोलीस तेथे दाखल झाले आणि त्यांनी त्याला ताब्यात घेतलं. समोर आलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हर रईसनं केवळ महिलांचे कपडे आणि बुरखा परिधान केला नव्हता, तर त्यानं महिलांचे अंडरगारमेंट्सही घातले होते.
ताब्यात घेतल्यानंतर रईस म्हणाला की, मला लेडीज बाथरूम बघायचं होतं. म्हणून मी बुरखा घातला. पकडल्यावर त्यानं सांगितलं की तो महिलाडॉक्टर गजालाचा कार ड्रायव्हर आहे. दरम्यान पोलिसांनी सांगितलं की, व्यक्तीचे कुटुंबीय म्हणतात की तो पूर्णपणे मानसिकदृष्ट्या ठीक नाही, त्यामुळे असं होऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Uttar pradesh news