Home /News /national /

धक्कादायक! रिपोर्ट येण्याआधीच रुग्णाला दिला डिस्चार्ज, आता निघाला कोरोना पॉझिटिव्ह

धक्कादायक! रिपोर्ट येण्याआधीच रुग्णाला दिला डिस्चार्ज, आता निघाला कोरोना पॉझिटिव्ह

एकीकडे उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे वैद्यकिय कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा भारी पडताना दिसत आहे.

    कानपूर, 29 एप्रिल : भारतात कोरोनाना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 30 हजारहून जास्त झाला आहे. अशा परिस्थितीत जास्तीत जास्त चाचण्या केल्या जात आहेत. मात्र कानपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. एकीकडे उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे वैद्यकिय कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा भारी पडताना दिसत आहे. कानपूरच्या सरसौल येथे एक भयंकर घटना घडली. एका विद्यार्थ्याला कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र कोरोना रिपोर्ट येण्याआधीच त्याला डिस्चार्ज देण्याता आला. त्यानंतर तब्येत पुन्हा ढासळल्यावर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या प्रकारानंतर रुग्णालय प्रशासनाची झोप उडाली आहे. वाचा-3 मेपर्यंतचा लॉकडाऊन संपल्यानंतर कधी सुरू होणार रेल्वे?आज निर्णय होण्याची शक्यता या सगळ्या गंभीर प्रकारानंतर वैद्यकिय विभागातील कर्मचारी एकमेकांवर आरोप करत आहेत. दुसरीकडे, मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चौकशीची मागणी करत आहेत. 27 एप्रिल रोजी मदरशा विद्यार्थ्यांचे दोन रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. मात्र मदरशाजवळ येताच एका विद्यार्थ्याची प्रकृती खालावली. सीएचसी अधीक्षक सीएल वर्मा यांना याची माहिती मिळताच रुग्णवाहिका तातडीने परत पाठविली गेली आणि मदरशामधून या रुग्णाला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वाचा-अमेरिका हादरलं! वृद्धाश्रमात पडला मृतांचा खच, 70 कोरोना रुग्णांचा मृत्यू तपासाचे आदेश या संपूर्ण प्रकरणावर सीएचसीचे अधीक्षक सरसौल सीएल वर्मा यांना विचारले असता त्यांनी सांगितले की मदरशाला पोचल्यानंतर विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली. लगेचच रुग्णवाहिका पाठवून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचबरोबर मुख्य वैद्यकीय अधिकारी अशोक कुमार शुक्ला यांनी सांगितले की, रुग्णाचे रिपोर्ट न पाहता त्याला कसा डिस्चार्ज देण्यात आला याची चौकशी केली जात आहे. तपासणीनंतर कारवाई केली जाईल. कानपूरमध्ये संक्रमित होण्याचे प्रमाण 200च्या वर गेली आहे. तर, जिल्ह्यात आतापर्यंत 4 लोकांचा मृत्यू झाला आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या