मराठी बातम्या /बातम्या /देश /

टेम्पो आणि बसचा भीषण अपघात; 17 जणांचा मृत्यू

टेम्पो आणि बसचा भीषण अपघात; 17 जणांचा मृत्यू

Bus and auto Accident: कानपूर येथे झालेल्या भीषण अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

Bus and auto Accident: कानपूर येथे झालेल्या भीषण अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

Bus and auto Accident: कानपूर येथे झालेल्या भीषण अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

  • Published by:  Sunil Desale

कानपूर, 8 जून: उत्तरप्रदेशातील कानपूर (Kanpur, Uttar Pradesh) येथे भीषण अपघात झाला आहे. भरधाव टेम्पो आणि ट्रॅवल्स बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात 17 जणांचा मृत्यू (17 died after Tempo and bus collision) झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, टेम्पोचे अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कानपूर येथील सचेंडी पोलीस स्टेशन अंतर्गत रतन खेडा येथे कानपूर-इटावा महामार्गावर हा अपघात झाला आहे. महामार्गावर भरधाव बसला टेम्पोने पाठिमागून धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, टेम्पो महामार्गाच्या किनाऱ्यावर जाऊन पलटी झाला. तर बस सुद्धा अनियंत्रित होऊन पलटी झाली. या अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला आहे तर जवळपास 18 जण जखमी झाले आहेत.

दुर्घटनाग्रस्त ट्रॅव्हल्स बस कानपूर येथून अहमदाबादकडे जात होती. घटनास्थळी दाखल झालेले पोलीस अधिकारी मोहित अग्रवाल यांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीत असे समोर आले आहे की साचेंदी येथील बिस्किट फॅक्ट्रीत काम करणारे कर्मचारी हे टेम्पोतून प्रवास करत होते. हे सर्वजण फॅक्ट्रीत जात होते.

अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन दु:ख व्यक्त केलं आहे. पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, कानपूर येथे झालेला रस्ता अपघात अतिशय दुख:द घटना आहे. या अपघातात अनेक नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मी मृतकांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त करतो.

मात्र, त्याच दरम्यान वाटेत बसने टेम्पोला जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळातच घटनास्थळी स्थानिक नागरिक, पोलिसांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

First published:

Tags: Accident, Kanpur, Uttar pradesh