MRI करताना 8 वर्षाच्या मुलीचा झाला जागीच मृत्यू, कारण...

MRI करताना 8 वर्षाच्या मुलीचा झाला जागीच मृत्यू, कारण...

MRI करण्यासाठी सेंटरमध्ये नेलं. तिचा MRI करून तिला बाहेर काढलं आणि...!

  • Share this:

उत्तर प्रदेश, 06 सप्टेंबर : रुग्णाचा MRI (Magnetic Resonance Imaging)केल्याचं तुम्ही पाहिलंच असेल पण त्यातून रुग्णाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 8 वर्षाच्या मुलीचा एमआरआय केल्यानंतर तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एमआरआय करण्यासाठी गेलेल्या मुलीचा सेंटरमध्येच मृत्यू झाला. त्यामुळे मृत मुलीच्या कुटुंबीयांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

MRIसाठी घेऊन जाताना मुलीवर ओव्हरडोस दिल्यामुळे तिचा मृत्यू झाला असल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. लाला लाजपत राय रुग्णालयात खासगीरित्या चालवल्या जाणार्‍या एमआरआय सेंटरमध्ये ही घटना घडली आहे. मुलीच्या कुटूंबाचा असा आरोप आहे की एमआरआयच्या अति प्रमाणात डोसमुळे तिचा मृत्यू झाला. कानपूरच्या एलएलआर हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. आरके मौर्य यांनी एमआरआय सेंटरला नोटीस बजावून उत्तर मागितलं आहे. केंद्राकडून उत्तर मिळाल्यानंतर पुढील कार्यवाई केली जाईल, असं सीएमएसचं म्हणणं आहे.

मुलीवर हृदयविकाराचा झटकावर (कार्डियोप्‍लेजिया ) उपचार सुरू होते

एलएलआर रुग्णालयाच्या बालरोग शाखेत मुलीच्या हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी उपचार सुरू असल्याचे कुटुंबीयांनी सांगितलं. ज्यामध्ये धड्याच्या खाली असलेले अवयव व्यवस्थित काम करत नव्हते. डॉक्टरांनी तिचं एमआरआय स्कॅन करण्यास सांगितलं. यासाठी त्यांना रुग्णालयातच खासगीरित्या चालविल्या जाणाऱ्या लाईफलाईन सेंटरमध्ये नेण्यात आलं.

MRI सेंटरने म्हटलं आहे की, मुलीला त्रास होऊ शकतो, म्हणून तिचे स्कॅन होईपर्यंत तिला बेशुद्ध ठेवलं जाईल. पण तीन तासानंतर मुलाचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. कुटुंबीयांनी मुलाला दवाखान्यात नेलं असता डॉक्टरांनीही त्याला तिथे मृत घोषित केलं. जेव्हा कुटुंबीयांनी याचा विरोध केला तेव्हा केंद्राच्या कर्मचार्‍यांनी मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवून कुंटुबीयांना धमकावण्याचा प्रयत्न करण्यात आला.

इतर बातम्या - कोल्हापूरला पुन्हा महापुराचा धोका, धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

एमआरआय केंद्राचे प्रभारी यांनी दिलं स्पष्टीकरण

यावर केंद्राचे प्रभारी पूनम पांडे म्हणाल्या की, ओव्हरडोसमुळे मुलीचा मृत्यू झाला नाही. त्याऐवजी जेव्हा तिला इथे आणलं गेलं तेव्हा तिची प्रकृती बरीच वाईट होती.

इतर बातम्या - बाप्पाची आरती ठरली अखेरची, 10 वर्षाच्या चिमुकल्याला...

VIDEO: तरुणाच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड, बाप्पाची वर्गणी दिली नाही म्हणून काढला राग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 6, 2019 11:22 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading