कानपूर, 17 नोव्हेंबर : एकीकडे देशभरात दिवाळीचा उत्साह असताना उत्तर प्रदेशमधील कानपूर जिल्ह्यातील घाटमपूर भागात मात्र एक घृणास्पद घटना घडली. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी काळी जादू आणि तंत्र मंत्रासाठी एका 6 वर्षांच्या दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक ब्रिजेश श्रीवास्तव यांनी सोमवारी सांगितले की, या प्रकरणात अंकुल कुरील (20) आणि बीरन (31) यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मुलीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिची गळा दाबून हत्या केली. एवढेच नाही तर हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपींनी पीडित मुलीची दोन्ही फुफ्फुसं काढून मुख्य आरोपी पुरुषोत्तमला देण्यात आली. पुरुषोत्तमला काळ्या जादूसाठी या अवयवांची आवश्यकता होती, अशी माहिती आरोपींनी पोलिसांना दिली.
वाचा-मित्राने साखरपुड्याला बोलावले अन् दारू पाजून केला सामूहिक बलात्कार,मुंबईतील घटना
श्रीवास्तव यांनी सांगितले की, मुख्य आरोपी पुरुषोत्तला रविवारी अटक करण्यात आली, तर त्याची पत्नीही या गुन्ह्यात सामील असल्याच्या संशयातून तिलाही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तमनं सुरुवातीला पोलिसांना उलट-सुलट माहिती दिली, मात्र त्यानंतर त्यानं गुन्हा कबुल केला. चौकशीत पुरुषोत्तमनं सांगितले की, 1999 मध्ये त्याचे लग्न झाले होते, मात्र त्यांना बाळ होत नव्हते. श्रीवास्तव यांच्या म्हणण्यानुसार, पुरुषोत्तम यांनी सांगितले की बाळ होण्यासाठी कोणीतरी त्यांना काळी जादू करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, यासाठी त्यांना मुलीच्या फुफ्फुसांची गरज होती. म्हणूनच त्याने त्याचा पुतण्या अंकुल आणि त्याचा मित्र बिरान यांना शेजारच्या मुलीचे अपहरण करण्यास सांगितले.
वाचा-पत्नीला आणण्यासाठी सासरी गेला पती; कुटुंबीयांनी जबरदस्तीनं केलं धर्मांतर
अचानक बेपत्ता झाली चिमुरडी
पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. प्रीतिंदर सिंह यांनी सांगितले, की घाटमपूर कोतवाली परिसरातील एका गावात राहणारे कुटुंब शनिवारी दीपावलीची पूजा करण्याची तयारी करत होते, तेव्हा त्यांची 6 वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती. कुटुंबियांनी रात्रभर मुलीचा शोध घेतला. आणि रविवारी सकाळी ग्रामस्थांनी मुलीचा मृतदेह पाहिला. पोलिसांनी सांगितले की, मुलीच्या शरीरावर जखमा असल्याचे आढळून आले. तिची धारधार शस्त्रानं हत्या केल्याचा संशय आहे. तर, झाडावर तिची एक चप्पल आणि कपडे सापडले.
वाचा-अपघात की हत्या? पतीनेच पत्नीला 1000 फूट दरीत ढकलल्याच्या आरोपामुळे खळबळ
दोषींवर कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्री योगी यांचे निर्देश
तंत्र-मंत्रासाठी मुलीच्या हत्येच्या संदर्भात डीआयजी म्हणाले की, याची पुष्टी करण्यासाठी पुरावे गोळा केले जात आहेत. यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुलीच्या हत्येच्या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. राज्य सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. फास्ट ट्रॅक कोर्टात या खटल्याची सुनावणी घेऊन राज्य सरकार लवकरात लवकर गुन्हेगारांना शिक्षा देईल, असे मुख्यमंत्री योगी यांनी सांगितले.