अखिलेश यादव यांना आपल्या पत्नीचीही वाचवता आली नाही जागा

अखिलेश यादव यांना आपल्या पत्नीचीही वाचवता आली नाही जागा

कन्नैज या सुरक्षीत समजल्या जाणाऱ्या मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र मोदी लाटेपुढे त्यांचा टिकाव लागला नाही.

  • Share this:

लखनऊ 23 मे : उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाला जोरदार हादरा बसलाय. राज्याचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यांचा पराभव झालाय. भाजपचे उमेदवार सुब्रत पाठक यांनी त्यांचा 30 हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केलाय. कन्नैज या सुरक्षीत समजल्या जाणाऱ्या मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. त्या तिथल्या विद्यमान खासदार होत्या. मात्र बसपासोबत आघाडी असतानाही त्या आपली जागा वाचवू शकल्या नाहीत. जनतेने दिलेला पराभव मान्य असल्याची प्रतिक्रिया डिंपल यादव यांनी व्यक्त केलीय.

राज्यात यादव कुटुंबातल्या अनेक सदस्यांनी निवडणूक लढवली होती. त्यात डिंपल यादव यांचा पराभव सर्वात धक्कादायक मानला जातो. सुब्रुत पाठक यांनी सलग तिसऱ्यांदा कन्नौजमधून निवडणूक लढवली होती. डिंपल यांच्या विरुद्ध त्यांचे चुलत सासरे शिवपाल यादव यांच्या प्रगतिशील समाजवादी पक्ष (लोहिया) यांनी उमेदवार उभा केला होता. मात्र नंतर तांत्रिक कारणांमुळे त्याला माघार घ्यावी लगाली.

उत्तर प्रदेशात बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टीने आघाडी केली होती. त्यामुळे त्यांचं मोठं आव्हान भाजपपुढे होतं मात्र नरेंद्र मोदी फॅक्टर आणि मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा करिष्मा कामी आला उत्तर प्रदेशात भाजपला 60, बहुजन समाजवादी पक्षाला 10 तर समाजवादी पक्षाला 5 जागा मिळाल्या. दोनही पक्षांची मते ऐकमेकांना जातील असं या नेत्यांना वाटलं होतं मात्र तसं झालेलं दिसत नाही.

देशातल्या सगळ्या एक्झिट पोल्सने जे अंदाज व्यक्त केले होते त्यापेक्षा जास्त जागा फक्त भाजपला मिळाल्या आहेत. एकट्या भाजपला 303 जागा मिळण्याचं जवळपास निश्चित झालंय. तर NDAच्या खात्यात 354 जागा मिळणार आहेत. काँग्रेसला फक्त 51 जागा मिळाल्या आहेत तर UPA 90 जागा मिळण्याचं निश्चित झालंय. तर इतरांना 98 जागा मिळाल्या आहेत.

First published: May 23, 2019, 11:12 PM IST
Tags:

ताज्या बातम्या