Home /News /national /

कन्हैया कुमार यांची फजिती, राष्ट्रगान गाताना घातला गोंधळ

कन्हैया कुमार यांची फजिती, राष्ट्रगान गाताना घातला गोंधळ

या रॅलीदरम्यान 6-7 वर्षांच्या चिमुरड्याने व्यासपीठावर नरेंद्र मोदी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या

    पाटणा, 28 फेब्रुवारी : जेएनयू (जवाहर लाल नेहरु) विद्यार्थी संघाचे पूर्व अध्यक्ष आणि सीपीआय नेते कन्हैया कुमार गुरुवारी ‘संविधान बचाओ, नागरिकता बचाओ’ महारॅलीत सहभागी झाले होते. मात्र ही रॅली वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. या रॅलीत भाषण करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित राहिलेल्या नेत्यांनी अनेकदा भाषेच्या मर्यादा ओलांडल्या. सर्वात शेवटी कन्हैया कुमार यांनी भाषण केले. आपल्या भाषणाची सुरुवात करण्यापूर्वी कन्हैया कुमार यांनी गांधी मैदानातील उपस्थित लोकांना उभं राहून राष्ट्रगान गाण्याची विनंती केली आणि राष्ट्रगानाला सुरुवात केली.चर्चा तेव्हा सुरू झाली जेव्हा राष्ट्रगानाच्या शेवटच्या दोन ओळीत कन्हैया यांनी ‘जन गण मंगल’ च्या ऐवजी ‘जन मन गण’ गायले. 'आज तक' या वृत्त माध्यमांनी हे वृत्त दिलं आहे. कन्हैया कुमार यांच्या भाषणाच्या सुरुवातीलाही असाच गोंधळ झाला होता. व्यासपीठावर 6-7 वर्षांच्या चिमुरड्याने देशाच्या सद्य परिस्थितीवर चार ओळी ऐकवल्या आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नरेंद्र मोदी मुर्दाबादची घोषणा देऊ लागला. या चिमुरड्याच्या तोंडून नरेंद्र मोदी मुर्दाबादची घोषणा ऐकल्यानंतर व्यासपीठावरील उपस्थित काही लोकांनी यावर सहमती दर्शवली आणि कन्हैया कुमारने या मुलाला आपल्याकडे बोलावून मिठी मारली. कन्हैया यांच्या रॅलीत सहभागी होण्यासाठी आलेले महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी नागरिकत्व कायद्यासह, एनआरसी आणि एनपीआर यांची तुलना त्या तीन गोळ्यांशी केली, ज्या नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांच्या छातीत झाडल्या होत्या. हेही वाचा -देशात विघटन करणाऱ्या शक्तीचा उन्माद.. म्हणत प्रज्ञासिंह यांची सोनियांवर टीका
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: BJP narendra modi, Kanhaiya Kumar, Sanvidhan Bachao Rally

    पुढील बातम्या