Home /News /national /

येत्या 28 सप्टेंबरला काँग्रेसमध्ये या दोन बड्या नेत्यांची होणार एन्ट्री; सुत्रांची माहिती

येत्या 28 सप्टेंबरला काँग्रेसमध्ये या दोन बड्या नेत्यांची होणार एन्ट्री; सुत्रांची माहिती

पुढच्या वर्षी पंजाब (Punjab) आणि गुजरात (Gujrat) मध्ये विधानसभा निवडणुका (Assembly Election 2022) होणार आहेत.

    नवी दिल्ली, 25 सप्टेंबर: पुढच्या वर्षी पंजाब (Punjab) आणि गुजरात (Gujrat) मध्ये विधानसभा निवडणुका (Assembly Election 2022) होणार आहेत. या निवडणुकांपूर्वी (Election) बऱ्याच हालचाली सुरु झाल्या आहेत. दोन्ही राज्यांमध्ये मुख्यमंत्री बदलल्यानंतर इतर नेत्यांच्याही काही हालचाली होत असताना दिसत आहे. त्यातच एक अपडेट समोर येतेय ती म्हणजे, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. सुत्रांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. तर गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी (Jignesh Mewani) हेही काँग्रेसमध्ये जाण्यासाठी तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांनी दिलेल्या माहितीनंतर हा दावा केला आहे. दोघंही येत्या 28 सप्टेंबरला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा होऊ शकते. हेही वाचा- ठरलं! असं असेल पंजाबचं नवं मंत्रिमंडळ, 'या' नेत्यांना डच्चू याच महिन्यात कन्हैया कुमारनं काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्याचा दावा राजकीय वर्तुळात करण्यात आला. असंही म्हटलं गेलं की, कन्हैया कुमारनं राहुल गांधी यांची एकदा नाही तर दोनदा भेट घेतली. मीडिया रिपोर्टनुसार, या दोन्ही भेटीदरम्यान प्रशांत किशोर देखील उपस्थित होते. मात्र कन्हैया कुमारनं राहुल गांधी यांच्यासोबतच्या बैठकीचं वृत्त नाकारलं आहे. दोनों नेता के कांग्रेस में शामिल होने का ऐलान 28 सितंबर को किया जा सकता है. |(फोटो- ANI) बिहारमध्ये काँग्रेसची जोरदार तयारी? 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कन्हैया कुमारला दारुण पराभवाला सामोरे जावं लागलं. कन्हैया कुमार सीपीआयच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरला होता. भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीराज सिंह यांनी त्याचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. राजकीय तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, जर तो काँग्रेसमध्ये सामील झाला तर ही त्याच्या राजकीय प्रवासाची नवी सुरुवात होईल. असंही म्हटलं जात आहे की, कन्हैया कुमारच्या मदतीनं काँग्रेसला बिहारमधील आपली कमकुवत झालेली जागा मजबूत करायची आहे. IPL 2021: CSK च्या 'या' खेळाडूशी धोनीचं दरवर्षी होतं भांडण, माहीनं स्वत: सांगितलं वादाचं कारण  जिग्नेशच्या आगमनाचा काँग्रेसला फायदा होईल का? दुसरीकडे, दलित समाजातील जिग्नेश मेवानी हे गुजरातचे अपक्ष आमदार आहेत. गुजरात प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी दिल्लीत बसलेल्या हायकमांडशी जिग्नेशबाबत बोलल्याचं सांगितलं जात आहे. नुकतंच गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर मेवानी यांनी जोरदार टीका केली होती.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Congress, Rahul gandhi

    पुढील बातम्या