News18 Lokmat

कमलनाथ मध्य प्रदेशचे 18 वे मुख्यमंत्री, शपथविधी समारंभाला विरोधकांची एकजूट

शपथविधी समारंभाच्या निमित्तानं काँग्रेसने विरोधीपक्षांची एकजूट घडवून आणत भाजपला इशार दिलाय.

News18 Lokmat | Updated On: Dec 17, 2018 03:29 PM IST

कमलनाथ मध्य प्रदेशचे 18 वे मुख्यमंत्री, शपथविधी समारंभाला विरोधकांची एकजूट

भोपाल, 17 डिसेंबर : मध्य प्रदेशचे 18 वे मुख्यमंत्री म्हणून कमलनाथ यांनी आज शपथ घेतली. भोपाळच्या जंबूरी मैदानावर झालेल्या भव्य कार्यक्रमात त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. कार्यक्रमाला काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासह विरोधीपक्षाचे दिग्गज नेते उपस्थित होते. यात माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा, कर्नाटकचे मुख्यमत्री कुमारस्वामी, फारूख अब्दुल्ला, शरद यादव, एम.के स्टॅलीन यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

शपथविधी समारंभाच्या निमित्तानं काँग्रेसने विरोधीपक्षांची एकजूट घडवून आणल्याचं बोललं जातंय. या कार्यक्रमात राज्यातल्या साधू संतांनाही निमंत्रित करण्यात आलं होतं. माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते.


मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांची 10 दिवसात सरसकट कर्जमाफी देणार, अशी घोषणा कमलनाथ यांनी केली होती. ती त्यांना पूर्ण करावी लागणार आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचारात मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. निवडणूक विजयानंतर राहुल यांनी कर्जमाफीवर केलेल्या विधानावरून विरोधकांकडून त्यांना टार्गेट करण्यात आलं.


Loading...

निवडणूक जिंकल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल म्हणाले होते की, कर्जमाफी हे शेतीवरील शेवटचं उत्तर नाही. शेती प्रश्नावरील उत्तर खूप अवघड आहे. आम्ही ते शोधण्याचा प्रयत्न करू. आम्ही कर्जमाफीदेखील देऊ.'


स्थानिक पातळीवर चालणारा प्रचंड भ्रष्टाचार, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, ग्राम पंचायत पातळीवर गोशाळा उभारणी हे प्रश्न मार्गी लावणं, हे आपल्या सरकारचे पहिले प्राधान्य असेल, असं कमलनाथ म्हणाले. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत 114 जागा मिळवलेली काँग्रेस बहुमतापासून अवघ्या दोन जागा दूर होतं. अशा स्थितीत बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनीही काँग्रेसला थेट पाठिंबा जाहीर केला होता.

या निवडणुकीत 114 जागा मिळवत काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष ठरला. तर भाजपला 109 जागांवर समाधान मानावं लागलं. इतरांच्या खात्यात 7 जागा गेल्या आहेत. मध्य प्रदेश हा वर्षानुवर्ष भाजपचा गड राहिला आहे. पण आता काँग्रेसने हे राज्य हिसकावून घेत भाजपला चांगलाच दणका दिला आहे. भाजप सरकाविरोधातील रोष आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चिकाटीने केलेला प्रचार हे या सत्ताबदलामागील मुख्य कारण आहे. 

VIDEO: संभाजी भिडेंच्या सभेत दलित युथ पॅन्थरच्या कार्यकर्त्यांचा राडा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 17, 2018 03:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...